Budh Gochar In Mesh 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह आपापल्या गतीनुसार वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. याचा प्रभाव १२ राशींच्या आयुष्यात शुभ अशुभ स्वरूपात व कमी अधिक तीव्रतेने जाणवतो. एकाच राशीत जेव्हा दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा त्यातून महायुतीसह राजयोग निर्माण होतो, असं म्हणतात. अशीच एक युती सध्या मेष राशीत निर्माण होणार आहे. १० मे ला बुद्ध ग्रह गोचर करून मेष राशीत प्रवेश करणार आहे. तिथे अगोदरच असलेल्या शुक्रासह बुधाची युती होणार आहे. बुध व शुक्राच्या युतीने लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहे. १० मे ते १९ मे पर्यंत हा राजयोग सक्रिय असणार आहे. विशेष म्हणजे लक्ष्मी नारायण राजयोग हा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तयार होत आहेत. असं म्हणतात, अक्षय्य तृतीयेला झालेला लाभ हा अक्षय्य म्हणजे कधीही न संपणारा असा असतो. असा दीर्घकाळ टिकणारा लाभ नक्की कोणत्या राशीच्या कुंडलीत आहे हे पाहूया..
अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी नारायण योग, कुणाच्या नशिबात धनाचा वर्षाव होणार?
मेष रास (Aries Rashi Bhavishya)
मेष राशीतच लक्ष्मी नारायण योग निर्माण होत आहे. यामुळे या राशीला शुभ फळ प्राप्त होणार आहे. या कालावधीत बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकते. नोकरदारांना वेतनात वाढ मिळू शकते. आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढू शकतात. व्यवसायात धनाची गुंतवणूक करावी लागेल. शेअर बाजारातील गुंतवणूक सुद्धा फायद्याची ठरू शकते. अविवाहित किंवा विवाह करू इच्छिणाऱ्यांना चांगले स्थळ सांगून येईल.
कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)
शुक्र व बुधाच्या युतीने निर्माण होणारा लक्ष्मी नारायण राजयोग हा कर्क राशीला अनुकूल परिणाम देऊ शकतो. कामाच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते. या कालावधीत तुम्हाला धनलाभासाठी तुमचे कर्म कामी येणार आहे. जुन्या गुंतवणुकीचे फायदे होऊ शकतात. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकते. व्यायसायिकांना धनलाभासाठी नवे संपर्क कामी येतील. कौटूंबिक सुख अनुभवाल, नाती भक्कम होतील. स्थैर्य अनुभवता येईल.
हे ही वाचा<< अमावस्येला ३ दुर्मिळ योग; शनी- गुरु- शुक्राच्या राशी होतील गडगंज श्रीमंत? दुःखाचे ढग सरतील, पितर देतील लाभ
मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)
मिथुन राशीच्या मंडळींसाठी लक्ष्मी नारायण राजयोग फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक मिळकतीचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यापाऱ्यांना लाभ होईल. तुमच्या मनाला व शरीराला आराम देण्यासाठी पैसे खर्च करण्यास सक्षम व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमचे हितशत्रू दूर होतील. नोकरदार मंडळींना पदोन्नतीसह पगारवाढीचा सुद्धा फायदा होऊ शकतो. अडकून पडलेली कामे मार्गी लागतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)