Budh Gochar In Mesh 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह आपापल्या गतीनुसार वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. याचा प्रभाव १२ राशींच्या आयुष्यात शुभ अशुभ स्वरूपात व कमी अधिक तीव्रतेने जाणवतो. एकाच राशीत जेव्हा दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा त्यातून महायुतीसह राजयोग निर्माण होतो, असं म्हणतात. अशीच एक युती सध्या मेष राशीत निर्माण होणार आहे. १० मे ला बुद्ध ग्रह गोचर करून मेष राशीत प्रवेश करणार आहे. तिथे अगोदरच असलेल्या शुक्रासह बुधाची युती होणार आहे. बुध व शुक्राच्या युतीने लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहे. १० मे ते १९ मे पर्यंत हा राजयोग सक्रिय असणार आहे. विशेष म्हणजे लक्ष्मी नारायण राजयोग हा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तयार होत आहेत. असं म्हणतात, अक्षय्य तृतीयेला झालेला लाभ हा अक्षय्य म्हणजे कधीही न संपणारा असा असतो. असा दीर्घकाळ टिकणारा लाभ नक्की कोणत्या राशीच्या कुंडलीत आहे हे पाहूया..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा