Akshaya Tritiya 2023: हिंदू धर्मीयांमध्ये अक्षय्य तृतीया या सणाला प्रचंड महत्त्व आहे. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशी कोणत्याही कार्याची सुरुवात केल्यास ते कार्य सुफल संपूर्ण होते असे म्हटले जाते. ही तिथी सोने खरेदीसाठी शुभ मानली जाते. अक्षय्य तृतीयेच्या मृहूर्तावर व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली अशी असे म्हटले जाते. त्याशिवाय या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला अशी अख्यायिका प्रसिद्ध आहे. अक्षय्य तृतीयेचा सण व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वपूर्ण असतो. यंदाच्या ग्रह स्थितीनुसार अक्षय्य तृतीयेला पंचग्रही राजयोग तयार होत आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अभ्यासकांच्या माहितीनुसार अक्षय्य तृतीयेला २२ एप्रिलला मेष राशीत सूर्य, बुध, गुरु, शुक्र, व युरेनससह पंचग्रह युती तयार होत आहे. तसंच यावेळी मेषच्या जवळच्या वृषभ राशीत शुक्र द्वितीय स्थितीत व चंद्र एकत्र आले आहेत. यामुळे मेष- वृषभसह काही राशींच्या भाग्यात सुवर्णकाळ सुरु होण्याची चिन्हे आहेत. यात तुमच्या राशीचा समावेश आहे का व असल्यास तुमच्या राशीला नेमका कसा लाभ होणार हे पाहूया…
मेष रास (Mesh Rashi)
मेष राशीतच पंचग्रह योग तयार होत असल्याने या राशीला काहीच दिवसात प्रचंड धनलाभाचे योग आहेत. तुम्हाला आयुष्यात मान- सन्मान अनुभवता येऊ शकतो यामुळे स्वतःच्या व्यक्तिमत्वात तुम्हाला काही सकारात्मक बदल दिसून येऊ शकतो. तुम्हाला स्वतःला लाभ होताना इतरांना सुद्धा मदत करायला विसरू नये यामुळे मानसिक शांती व सुख अनुभवता येऊ शकते.
वृषभ रास (Vrushbh Rashi)
वृषभ राशीत शुक्र व चंद्र युती तयार झाल्याने तुम्हाला आयुष्यात शीतलता अनुवाहता येऊ शकते. यादिवशी तुमचे मन व डोकं शांत होऊन तुम्हाला स्वतःची नव्याने ओळख करून घेता येऊ शकते. आयुष्यात मोठे बदल घडवणारे निर्णय घ्यावे लागू शकतात. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी फायद्याचा काळ आहे, तुम्ही तज्ज्ञांच्या मदतीने शेअर बाजारात गुंतवणुकीचा विचार करू शकता. तुमच्या जोडीदाराला जपून ठेवणे फायद्याचे ठरेल.
कर्क रास (Karka Rashi)
अक्षय्य तृतीयेपासून कर्क राशीचे अच्छे दिन सुरु होऊ शकतात. या राशीच्या दहाव्या स्थानी पंचग्रह योग तयार होत आहे. तर राशीच्या अकराव्या स्थानी शुक्र ग्रह स्थिर आहे. या राशीला सुरु केलेल्या प्रत्येक कामात यशप्राप्तीचे संकेत आहेत. धनलाभ झाल्याने तुम्ही राजेशाही थाट अनुभवू शकता. अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या खरेदीला महत्त्व आहे पण त्यासह तुम्ही अन्य गुंतवणुकीचे मार्ग सुद्धा अभ्यास करून निवडू शकता. आर्थिक स्रोत बळावण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा<< शनी-शुक्र येतायत एकत्र! ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी होणार विराजमान? महिन्याभरात होऊ शकता कोट्याधीश
सिंह रास (Sinha Rashi)
सिंह राशीच्या पंचम स्थानी सूर्यदेव गोचर करत आहेत. अशा स्थितीत सिंह राशीसाठी पंच ग्रह योग व अक्षय्य तृतीया दिवस अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. तुमची अडकून पडलेली कामे पूर्णत्वास लागू शकतात. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची चिन्हे आहेत. कौटुंबिक कलह कमी होऊन तुम्हाला मानसिक ताण तणावातून मुक्ती मिळू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारीत आहे)