aquarius Annual Horoscope 2025 : कुंभ ही शनीची रास आहे. धीरोदात्तपणा , मुत्सद्दीपणा, जिद्द, चिकाटी हे शनीचे गुण कुंभ राशीत विशेषत्वाने दिसून येतात. आपल्या कुशाग्र बुद्धीला सिद्धीचा वरद हस्त आहे. अगम्य, असाध्य असे मिळवण्याची आपली इच्छा असते. ज्ञानलालसा, संशोधक वृत्ती आणि प्रामाणिकपणा हे आपले खास गुण आहेत. आपली आकलनशक्ती चांगली असते. कोणत्याही कठीण प्रसंगातून बाहेर पडणे बुद्धिमत्तेच्या सहाययने आपणास शक्य होते. अशा कुंभ राशीला 2025 हे वर्ष कसे असेल ते पाहूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कुंभ राशीच्या दृष्टीने महत्वाच्या ग्रहांचे राशीबदल असे आहेत. 18 मार्चला हर्षल चतुर्थातील वृषभ राशीत प्रवेश करेल. 26 मार्चला शनी द्वितीयातील मीन राशीत प्रवेश करेल. साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होत आहे. 14 मे रोजी गुरू पंचमातील मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरुबल बलवान होईल. 29 मे रोजी वक्र गतीने राहू आपल्या कुंभ राशीत आणि केतू सप्तमातील सिंह राशीत प्रवेश करेल.

कुंभ राशीसाठी २०२५ वर्ष कसे असणार? जाणून घ्या (aquarius Yearly Horoscope 2025)

जानेवारी (January Horoscope 2025)

नव्या वर्षाची सुरुवात नित्य नियमांनुसार कराल. नव्या वर्षासाठी आपल्यात काय बदल करायचे आहेत याचा आराखडा आधीच तयार असेल. विद्यार्थी वर्ग शिक्षकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करेल. एकाग्रतेने अभ्यास करेल. गुरुबल कमजोर असल्याने नोकरी व्यवसायात संधी उपलब्ध असूनही त्या स्वीकारता येणार नाहीत. विवाहोत्सुकांनी विवाह जुळण्यासाठी आणखी थोडी वाट बघावी. विवाहित मंडळी आपल्या जोडीदाराच्या मेहनतीची कदर करतील. मकर संक्रांतीच्या दरम्यान घराचे व्यवहार लांबणीवर पडतील. मध्यस्थी व्यक्ती विश्वासू असणे गरजेचे आहे. गुंतवणूकदारांनी विचारपूर्वक गुंतवणूक करावी. भविष्याची तरतूद व आर्थिक सुरक्षा यांचा विचार कराल. कफ आणि वातविकार सतावतील. औषधोपचारासह प्राणायाम व व्यायाम उपयोगी ठरेल.

फेब्रुवारी (February Horoscope 2025)

अनेकविध कामांनी आणि जबाबदाऱ्यानी डोकं चक्रावून जाईल. कामे इतरांवर सोपवा. त्यांच्यावर विश्वास ठेवा. विद्यार्थी वर्गाची मेहनत, जिद्द वाखाणण्याजोगी असेल. साडेसाती व कमजोर गुरुबल यामुळे अधिक कष्ट घ्यावे लागतील. नोकरी व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला अतिशय उपयुक्त ठरेल. कामाचे स्वरूप बदलेल. विवाहोत्सुकांचे विवाह योग बलवान नाहीत. विवाहित मंडळींना जोडीदारासह जुळवून घ्यावे लागेल. वैचारीक मतभेद होतील. त्यात कटुता मात्र नसेल. प्रॉपर्टीच्या कामात तज्ज्ञांचे मत नीट ऐकून घ्याल. त्याबाबत आपणही विशेष अभ्यास कराल. गुंतवणूक दीर्घकालीन असल्याने डोक्याचा ताप वाढवणारी नसेल. महाशिवरात्र मानसिक समाधान आणि शांतीदायक असेल.

मार्च (March Horoscope 2025)

चिकाटी आणि जिद्द यांमुळे कष्टकारक परिस्थितीतून तावून सुलाखून बाहेर पडाल. विद्यार्थी वर्गाचा खरा कसोटीचा काळ आहे. लक्ष विचलित होऊ देऊ नका. रंगपंचमी उमेदीचे नवे रंग घेऊन येईल. 18 मार्चला हर्षल चतुर्थातील वृषभ राशीत प्रवेश करेल. मनस्थिती द्विधा होण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात महत्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. विवाहित दाम्पत्यांनी एकमेकांसाठी मोठी तडजोड करावी. कौटुंबिक समारंभात महत्वाची जबाबदारी पार पाडाल. 29 मार्चला शनी मीन राशीत प्रवेश करेल. साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. मधल्या टप्प्यापेक्षा शेवटचा टप्पा जरा सुकर असेल. घर, प्रॉपर्टीच्या कामाबाबत विनाकारण दिरंगाई होईल. गुंतवणूकदार उत्तम आर्थिक नियोजन करतील. आर्थिक वर्ष संपताना गुढीपाडवा यशाची पताका उंच उभारेल. मणक्याचे आरोग्य सांभाळावे.

एप्रिल (April Horoscope 2025)

तृतीय स्थानातील उच्चीचा रवी आत्मविश्वास वाढवेल. शब्द जपून वापरावेत. विद्यार्थी वर्गाची तयारी उत्तम असेल. सखोल अभ्यासासह ध्येय गाठण्याची जिद्द कामी येईल. नोकरी व्यवसायात अजूनही अडचणींची मालिका संपलेली नाही. आपली बुद्धिमत्ता योग्यप्रकारे वापराल. विवाहित दाम्पत्यांमधील गैरसमज वेळेवर दूर करावेत. मोकळेपणाने संवाद साधलात तर नक्कीच यश मिळेल. परदेशासंबंधीत कामकाज धीम्या गतीने पुढे सरकेल. वाट बघणे या शिवाय दुसरा पर्याय नाही. गुंतवणूकदारांचे आडाखे खरे ठरतील. अधिक सावधगिरी बाळगावी. फसवी वाढ मोहाचे फासे टाकेल. उष्णतेमुळे फोड, गळू होतील. त्यात पू भरेल. आहारात ऋतुमानानुसार बदल करावा.

मे (May Horoscope 2025)

वेळेचे भान ठेवल्याने आणि कामांचे नियोजन केल्याने या महिन्यात भरपूर लाभ होईल. विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक यश प्राप्त करण्यासाठी मोठी झेप घ्यावी लागेल. नोकरी व्यवसायानिमित्ताने बुधपौर्णिमेला प्रवास कराल. 14 मे रोजी गुरू पंचमातील मिथुन राशीत प्रवेश करेल. उत्तम गुरुबल प्राप्त होईल. विवाहोत्सुकांचे विवाहयोग सुरू होतील. प्रयत्न सुरू करावेत. विवाहित मंडळींना एकमेकांसाठी पुरेसा वेळ देता येईल. संतती प्राप्तीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. प्रयत्न यशस्वी होतील. घर, जागा, वडिलोपार्जित इस्टेट यांचे रखडलेले काम हळूहळू मार्गी लागेल. गुंतवणूकदार बाजारभावाचा बारकाईने अभ्यास करतील. भविष्याचा विचार करूनच गुंतवणूक करतील. 29 मे रोजी वक्र गतीने राहू आपल्या कुंभ राशीत व केतू सप्तमातील सिंह राशीत प्रवेश करतील. उन्हाळी सर्दीचा त्रास सहन करावा लागेल.

जून (June Horoscope 2025)

नियोजित कामे मनाजोगती पूर्ण कराल. नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक अशा अनेकांचे सहाय्य मिळेल. विद्यार्थी वर्ग नव्या क्षेत्रात पदार्पण करेल. उत्साहाने नवे विषय आत्मसात कराल. गुरुबल चांगले आहे. नोकरी व्यवसायात आपल्या मतांना मान मिळेल. त्याबद्दल विचारविनिमय,चर्चा होऊन ती अमलात आणली जातील. वटपौर्णिमा लाभकारक वार्ता घेऊन येईल. विवाहोत्सुकांनी जोडीदार संशोधन मनावर घ्यावे. विवाहित दाम्पत्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पडतील. नातीगोती जपणे आणि संबंध वृद्धिंगत करणे यासाठी ग्रहमान सहाय्यकरी आहे. जमिनीच्या व्यवहारात कोणत्याही प्रकारची हयगय वा हलगर्जीपणा नको. थोडा अधिक वेळ लागला तरी चालेल. गुंतवणूकदारांच्या नफ्याचा आलेख वरवर जाईल. कामाच्या व्यापामुळे मानसिक तणाव जाणवेल.

जुलै (July Horoscope 2025)

ग्रहस्थिती पूरक असली तरी साडेसातीचा प्रभाव दिसून येईल. हाती घेतलेली कामे धीम्या गतीने पुढे सरकतील. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात योग्य मार्गदर्शन मिळेल. नव्या समस्या, नवी आव्हाने समर्थपणे पेलाल. आषाढी एकादशीच्या दरम्यान नोकरी व्यवसायात आपल्या सखोल ज्ञानाचा आणि अभ्यासू वृत्तीचा उत्तम प्रभाव पडेल. सहकारी वर्गाकडून कामे करून घ्यावी लागतील. आपल्या बौद्धिक वेगापुढे इतरांचा वेग आपणास कमी वाटेल. गुरू पौर्णिमा लाभकारक ठरेल. विवाहोत्सुकांचे विवाह जुळतील. काही गोष्टींची तडजोड करण्याची तयारी ठेवावी. विवाहित मंडळींना कुटुंबासाठी काहीतरी करून दाखवता येईल. मित्र परिवाराची मदत उल्लेखनीय असेल. प्रॉपर्टीच्या कागदपत्रांची तपासणी करावी. ऐन वेळी एखादे दस्तावेज कमीअधिक असण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांसाठी परिस्थितीत बदल नाही.

ऑगस्ट ( August Horoscope 2025)

मेहनत, ज्ञान आणि वेळेचा सदुपयोग होईल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. विद्यार्थी वर्गाचे कष्ट फळास येतील. आकलन शक्ती चांगली असल्याने नवे विषयात रस वाढेल. तसेच मित्रांना समजवून सांगणे याचाही आपण आनंद घ्याल. नारळी पौर्णिमेला मनाची स्थिती चंचल व द्विधा असेल. न सांगता येणारी चिंता भेडसावेल. नोकरी व्यवसायात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी मुद्दे प्रभावीपणे मांडाल. जन्माष्टमी नंतर वरिष्ठांकडून या मुद्द्यांची दखल घेतली जाईल. गुरुबल चांगले असल्याने विवाहोत्सुकांनी जोडीदारासाठी संशोधन सुरू ठेवावे. विवाहित दाम्पत्यांना एकमेकांच्या सहवासाचे सुख लाभेल. श्री गणेशाच्या आगमनाने वैचारिक व बौद्धिक तसेच कलागुणांची देवाणघेवाण उत्साह वाढेल. गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळेल. कफ, खोकल्याचे प्रमाण वाढेल.

सप्टेंबर ( September Horoscope 2025) 

सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने श्रमदान व आर्थिक दान कराल. पितृपक्षात श्रध्दाभाव जागृत होईल. विद्यार्थी वर्ग परिक्षेच्या तयारीत गर्क असेल. सराव करताना वेळेचे गणित नीट बसवेल. नोकरी व्यवसायात आत्मविश्वासपूर्वक मांडलेली विधाने हितशत्रूंचा धुवा उडवतील. बढतीच्या दिशेने वाटचाल कराल. विवाहोत्सुकांना ओळखीतून स्थळ सांगून येईल. आचारविचार पटल्यास नातेसंबंध जुळतील. नवरात्र विशेष बातमी देणारी असेल. घर आणि प्रॉपर्टीचे कामकाज वेग घेईल. परदेशासंबंधीत गोष्टी मार्गी लागतील. अडथळे येतील पण ते मेहनतीने पार कराल. गुंतवणूकदारांना दक्षता घेऊन पुढे जाण्याचा इशारा मिळेल. भरपूर नफा नाही झाला तरी चालेल पण कष्टाने कमावलेला पैसा गमवू नका. दंड, खांदे आणि मणका यांचे आरोग्य सांभाळावे.

ऑक्टोबर (October Horoscope 2025)

नवरात्रात व दसऱ्याला मित्रमैत्रिणींना मदत करण्याची संधी मिळेल. काही वेळा स्पष्ट बोलणे सर्वांच्याच हिताचे ठरेल. विद्यार्थी आपली मेहनत, बुद्धिमत्ता आणि क्षमता पणाला लावतील. बारीकसारीक चुकांची शक्यता कमी होईल. नोकरी व्यवसायात हिमतीने आगेकूच कराल. साडेसातीमुळे अपेक्षित यश मिळाले नाही तरी विरोधकांना धडा शिकवाल. विवाहोत्सुकांचे जोडीदार संशोधन यशस्वी होईल. काही गोष्टींची तडजोड केलीत तर अनुरूप जोडीदार मिळेल. विवाहित दाम्पत्यांना संतती प्राप्तीच्या प्रयत्नात यश मिळेल. वैद्यकीय सल्ला व उपचार उपयुक्त ठरतील. 18 ऑक्टोबरला गुरू षष्ठ स्थानातील कर्क राशीत प्रवेश करेल. गुरुबल थोडे कमी होईल. घराचे कागदपत्र अपूर्ण असल्यास योग्य ती कार्यवाही करावी लागेल. कोर्टकचेरीच्या कामात दिरंगाई होईल. गुंतवणूकदारांना दिवाळीचे दिवस मध्यम मानाचे जातील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

नोव्हेंबर (November Horoscope 2025)

आपली तत्वे, आपले नियम काटेकोर पाळणे आणि त्रासदायक गोष्टीकडे दुर्लक्ष करणे हे या महिन्यात अत्यंत आवश्यक वाटेल. विद्यार्थ्यांचे शंका निरसन उत्तम प्रकारे होईल. शिक्षक, मार्गदर्शक योग्य दिशा दाखवतील. वेळेचा सदुपयोग कराल. नोकरी व्यवसायात आपल्यातील गुणांना चांगला वाव मिळेल. सर्वांच्या हिताचे निर्णय घ्याल. विवाहितांना नातेवाईक, मित्र परिवार यांचे साहाय्य व पाठिंबा मिळेल. प्रवास योग चांगले आहेत. देवदिवाळीच्या सुमारास शुभ वार्ता समजेल. घराचे व्यवहार, प्रॉपर्टीचे काम गतिमान होईल. तज्ञांचा योग्य सल्ला मिळेल. परदेशातील कामे मार्गी लागतील. गुंतवणूकदार उत्तम परतावा मिळवतील. जखम झाल्यास त्यात पू होईल. निष्कळजीपणा टाळा.

डिसेंबर (December Horoscope 2025)

4 डिसेंबरला श्री दत्त जयंतीच्या दिवशी घरासंबंधित कामात प्रगतीकारक बातमी येईल. 5 डिसेंबरला गुरू वक्र गतीने मिथुन राशीत प्रवेश करत आहे. विद्यार्थी अभ्यासासोबतच सामाजिक कार्यात, समारंभात सहभागी होतील. त्यांच्यातील कला व सर्जनशीलता यांना उत्तम वाव मिळेल. परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतील. विवाहोत्सुकांचे विवाह योग खूप चांगले आहेत. आर्थिक नियोजन करताना विशेष सावधानी बाळगावी. अनावधानाने काही गोष्टी डोक्यातून निसटून जाण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात वरिष्ठ आपल्या कामाची कदर करतील. गुंतवणूकदारांना लाभकारक ग्रहमान आहे. तरी देखील मोठी जोखीम घेणे धोक्याचे ठरेल. कौटुंबिक दृष्टया वातावरण आनंदी आणि उत्साही असेल.

Gemini Yearly Horoscope 2025 : मिथुन राशीसाठी २०२५ वर्ष कसे असणार? प्रगतीचे मार्ग मोकळे, प्रत्येक कामात यश, पण गुंतवणूकदारांनो सावध; वाचा वर्षाचे राशीभविष्य

एकंदरीत 2025 या वर्षात साडेसाती असल्याने व गुरुबल कमजोर असल्याने 14 मे पर्यंतचा काल खडतर असेल. त्यानंतर गुरुबल चांगले असल्याने व साडेसातीचा अंतिम टप्पा असल्याने अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील. शिक्षण, नोकरी, विवाह, संतती यांची चिंता मिटेल. आरोग्याच्या तक्रारी असल्या तरी नियमित व्यायाम, पथ्य आणि औषधोपचार यांच्या साथीने तब्येत चांगली राहील.
2025 हे वर्ष उत्कर्षकारक आणि प्रगतीचे असेल.