Kumbh Rashi Compatibility : राशीचक्रातील बारा राशींच्या लोकांचा स्वभाव हा राशीनुसार वेगवेगळा असतो. प्रत्येक राशीची व्यक्ती ही वेगवेगळ्या स्वभावाची असते. काही राशींचे एकमेकांबरोबर पटतात तर काही राशींचे अजिबात पटत नाही. कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव खूप मनमोकळा असतो. त्यांना एकच प्रकारची जीवनशैली आवडत नाही. ते प्रत्येकवेळी नवीन गोष्ट स्वीकारण्याचा प्रयत्न करतात फक्त त्यांचे काही राशींबरोबर पटत नाही. वृषभ, वृश्चिक आणि कर्क राशीचे लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो कारण या तीन राशींच्या लोकांचा स्वभाव कुंभ राशीच्या लोकांच्या स्वभावापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे जर या तीन राशींचे कुंभ राशीबरोबर नाते निर्माण झाले तरी त्यांच्या नात्यात नेहमी कटूपणा दिसून येतो. या तीन राशींचे कुंभ राशीबरोबर कसे नातेसंबंध असतात, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
वृषभ
कुंभ राशीचे लोक स्वतंत्र विचारांचे असतात तर वृषभ राशीचे लोक धैर्यवान असतात. या लोकांना कधी कोणत्या गोष्टीची घाई नसते आणि कधी त्यांना काहीतरी नवीन करण्याची इच्छा नसते. याच कारणामुळे या दोन राशींचे पटत नाही. कुंभ राशीचे लोक नवीन गोष्टी स्वीकारण्याचा प्रयत्न करतात तर वृषभ राशीचे लोक सुरूवातीला आरामात समजून घेतात आणि नंतर स्वीकारतात.
हेही वाचा : Sagittarius Compatibility : असा असतो धनु राशीचा स्वभाव, ‘या’ तीन राशीच्या लोकांबरोबर अजिबात पटत नाही
वृश्चिक
वृश्चिक राशीचे लोक आपल्या इच्छा दुसऱ्यांवर टाकतात आणि भावूक होतात पण हे धाडसी गोष्टी करताना दूर पळतात आणि थेट बोलायला घाबरतात. यांना नेहमी प्रेमाची भूक असते. त्यांनी इतरांकडून नेहमी फक्त प्रेमाची अपेक्षा असते. वृश्चिक राशीचा हा स्वभाव कुंभ राशीच्या लोकांना पटत नाही त्यामुळे यांच्या नात्यात अडचणी दिसून येतात.
कर्क
कर्क राशीचे लोक हे बोलके, स्वावलंबी, प्रामाणिक आणि कोणाच्याही समोर हार न मानणारे असतात आणि आपल्या गोष्टींवर ठाम असतात. यांची स्मरणशक्ती खूप जास्त चांगली असते. जुन्या गोष्टी सुद्धा यांच्या नेहमी लक्षात राहतात. अनेकदा विसरायची इच्छा असतानाही हे लोकं काही गोष्टी विसरू शकत नाही. त्यामुळे यांच्या नात्यामध्ये तेढ निर्माण होते. याच कारणामुळे या लोकांचे कुंभ राशीबरोबर पटत नाही
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)