प्रगतीचे सर्व प्रयत्न व्यर्थ जात असतील, घरातील लोकांना वारंवार आजारांनी घेरले असेल, पैशाची हानी होत असेल, तर त्यामागे वास्तुदोष असू शकतो. आता यासाठी बरीच तोडफोड करावी लागेल, अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली असेल. मात्र, तसे नाही. वास्तुशास्त्रात असे काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत, ज्याच्या मदतीने घरामध्ये कोणताही मोठा बदल न करता वास्तु दोष सहज दूर करता येतात. आज आपण हे उपाय जाणून घेऊया.

  • घरातील लोकांच्या प्रगतीत अडथळे येत असतील, नकारात्मक ऊर्जा वाढली असेल तर घराच्या ईशान्य कोपर्‍यात पक्षी, नद्या किंवा उगवत्या सूर्याचे चित्र लावावे. तसेच हा कोपरा स्वच्छ ठेवा. असे केल्याने वेगाने प्रगती होईल आणि धनलाभ होईल.

जून महिन्याची सुरुवात ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरणार लाभदायक; देवी लक्ष्मीची मिळणार साथ

New Home Investment, Tax Exemption,
करावे कर समाधान : नवीन घरातील गुंतवणूक आणि कर सवलत
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Redevelopment of government leased building with express intention of catering to builder lobby by MLA
मला अखेरपर्यंत याच घरात रहायचे आहे…
diwali cleaning tips hacks
फरशी पुसताना पाण्यात मिसळा ‘हे’ पदार्थ; काळपट, बुळबुळीत झालेली फरशी चमकेल अगदी नव्यासारखी
home decoration on diwali diwali decoration ideas diwali decoration ideas for home
घर सजवण्याची वेळ झाली…
beneficiary consumers ignoring to purchase home from affordable housing scheme
विश्लेषण : परवडणाऱ्या घरांचे गणित का बिघडले? लाभार्थी ग्राहक योजनांकडे पाठ का फिरवत आहेत?
easy kandil making at home for diwali how to make akashkandil at home easy steps video diwali lantern
Kandil making at home: स्वस्तात मस्त! घरच्या घरी बनवा आकर्षक कंदील, या दिवाळीत वापरा ‘ही’ सोपी पद्धत आणि वाचवा पैसे
aishwarya narkar bought new home
Video : ऐश्वर्या नारकरांनी घेतलं नवीन घर! पहिल्यांदाच दाखवली झलक, दिवाळीच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी
  • वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर योग्य दिशेने असणे, तसेच पाणी, गॅस स्टोव्ह, फ्रीज, जेवणाची व्यवस्था इत्यादी योग्य ठिकाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. तसे न झाल्यास त्याचा परिणाम घरातील लोकांचे आरोग्य, उत्पन्न इत्यादींवर होतो. अशा वेळी स्वयंपाकघराशी संबंधित सर्व वास्तुदोष दूर करण्यासाठी स्वयंपाकघरातील अग्नी कोनात लाल बल्ब लावून तो प्रज्वलित ठेवा. यामुळे स्वयंपाकघरातील वास्तुदोषाचे दुष्परिणाम दूर होतात.
  • घराच्या पश्चिम भागात काही दोष असेल तर या दिशेला शनियंत्र स्थापित करा आणि काही दिवसात त्याचा प्रभाव पाहा.
  • वाऱ्याच्या दिशेचे वास्तू दोष दूर करण्यासाठी हनुमानजींचा फोटो या दिशेला लावा. तसेच दररोज हनुमानजींच्या चित्रासमोर बसून हनुमान चालिसा वाचा. याशिवाय या ठिकाणी मास्यांचा टॅंक ठेवल्यास किंवा रोज ताज्या फुलांचा गुच्छ ठेवल्यासही परिणाम दिसेल.

सर्वोत्कृष्ट मुलगा आणि जावई सिद्ध होतात ‘या’ राशीची मुलं; सर्वांचे मन जिंकण्यात असतात पटाईत

  • घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीचे चित्र लावणे अनेक वास्तू दोषांवर उपाय आहे. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.
  • घराच्या पूर्व दिशेचा वास्तुदोष दूर करण्यासाठी या दिशेला सूर्याचे चित्र किंवा सात घोड्यांच्या रथावर बसलेल्या सूर्यदेवाचे चित्र लावावे. तसेच या दिशेला प्रकाश राहील अशी व्यवस्था करा. याचा सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येईल.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)