Ardhakendra Rajyog: हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्येला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. पौष महिन्यातील अमावस्येला मौनी अमावस्या म्हटले जाते. शास्त्रात या दिवशी व्रतासह दान करण्याचे महत्व सांगितले जाते. दरम्यान, या वर्षीची मौनी अमावस्या खूप खास मानली जात आहे. कारण, या अमावस्येला कर्मफळदाता शनी, बुध ग्रहाबरोबर शुभ राजयोग निर्माण करत आहे. ज्यामुळे काही राशींच्या व्यक्तींचे नशीब बदलेल. त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
पंचांगानुसार, २९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजून ५८ मिनिटांनी शनी आणि बुध एकमेकांपासून ४५ डिग्रीवर असतील, ज्यामुळे अर्धकेंद्र योग निर्माण होईल. तसेच सध्या शनी कुंभ राशीत विराजमान असून बुध ग्रह मकर राशीत विराजमान आहे. या दोन्ही ग्रहांचा अर्धकेंद्र योग काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरेल.
अर्धकेंद्र योग ठरणार भाग्यशाली
मेष
मेष राशीच्या व्यक्तींसाठी अर्धकेंद्र योग भाग्यकारक ठरेल. या काळात शनी अकराव्या आणि बुध दहाव्या घरात विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर सकारात्मक प्रभाव पाहायला मिळेल. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. अविवाहितांची लग्ने जुळतील. धार्मिक कार्यात तुमचे मन रमेल. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप लाभदायी ठरेल. बुध या राशीच्या सातव्या घरात असेल. ज्याच्या प्रभावाने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. तुमचे वैवाहिक जीवन सुखमय असेल.
मकर
अर्धकेंद्र योग मकर राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ ठरेल. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये प्रचंड वाढ होईल. नोकरीत बदल होईल. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. स्पर्धा परिक्षेची तयार करणाऱ्यांना यशाचे फळ मिळेल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. अडकलेली कामे पूर्णत्वास येतील.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)