आचार्य चाणक्यांच्या नीती जीवनाच्या प्रत्येक बाबतीत कमी-अधिक प्रमाणात उपयुक्त आहेत. मग ते जीवनात यश मिळवण्यासाठी असो, श्रीमंत होण्यासाठी असो, संकटातून बाहेर पडण्यासाठी असो किंवा संकटातून मुक्त होण्यासाठी असो. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या नीती आजही तितकीच समर्पक आहेत. चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की जर तुम्हाला जीवनातील त्रास आणि पश्चात्ताप टाळायचा असेल तर तुम्ही काही लोकांशी कधीही वाद घालू नका. या लोकांशी वाद घालणे तुमच्यासाठी खूप घातक ठरू शकते. जाणून घेऊया कोणत्या व्यक्तींशी वाद करणे आपल्याला नुकसानदायक ठरू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मूर्ख व्यक्ती :

आचार्य चाणक्य म्हणतात की मूर्ख व्यक्तीशी कधीही वाद घालू नये. यातून तुमचा वेळ तर वाया जातोच पण तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढून ते तुमची प्रतिमाही खराब करू शकतात. त्यामुळे मूर्ख व्यक्तींपासून अंतर ठेवणे चांगले.

‘या’ राशींच्या लोकांना मिळणार शनिदेवाच्या त्रासापासून मुक्ती; जाणून घ्या यामागील कारण

चांगले मित्र :

चांगला आणि खरा मित्र हा प्रत्येक सुख-दु:खाचा सोबती असतो. जर तुम्ही त्याच्याशी वाद घातला तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अतिशय प्रेमळ आणि विश्वासार्ह नाते गमावाल. याशिवाय जर एखाद्या मित्राचे मन बदलले तर तो तुमची अनेक गुपिते उघड करून तुमचे मोठे नुकसान करू शकतो.

परिजन :

आई-वडील, भावंड, पत्नी किंवा मुलांशी कधीही अशा प्रकारे वाद घालू नका की नाते तुटण्याच्या टोकापर्यंत पोहोचेल किंवा मनात तेढ निर्माण होईल. अशी चूक तुम्हाला आयुष्यभर दुःख देऊ शकते.

गुरु :

जीवनात गुरुची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी ते आपल्याला मार्गदर्शन करतात. ते आपल्याला आव्हानांना कसे सामोरे जावे हे सांगतात, ज्ञान देतात. म्हणून गुरूशी कधीही वाद घालू नका, अन्यथा तुम्ही गुरूंच्या कृपेपासून वंचित राहाल.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arguing with these people can be harmful for you repentance has to be done for life pvp