Aries Annual Horoscope 2025 : यंदाचे हे नवे वर्ष कसे जाईल, याची उत्सुकता प्रत्येकालाच असेल. अतिप्राचीन अशा ज्योतिषशास्त्राच्या आधारे याचा आढावा आपल्या जन्मकुंडलीनुसार घेता येतो. वैयक्तिक मार्गदर्शनाप्रमाणे ढोबळमानाने राशीनुसारही ज्योतिषीय मार्गदर्शन उपयोगी पडते. २०२५ हे वर्ष आपल्या राशीसाठी कसे असेल, आर्थिकदृष्ट्या हे वर्ष कसे असेल, हे जाणून घेणे प्रत्येकाला आवडेल. आज आपण राशिचक्रातील पहिल्या राशीविषयी म्हणजे मेष राशीचे वार्षिक भविष्य जाणून घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मेष राशी (Mesh Rashi 2025 Rashi Bhavishya)
मेष ही मंगळाची रास आहे. कर्तृत्व, धडाडी आणि हिंमत हे मंगळाचे गुणधर्म मेष राशीच्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने आढळतात. हे लोक नेतृत्व उत्तम करतात. हवे ते मिळवण्याची जिद्द आपल्यात असते. काही वेळा आरंभशूरपणा या लोकांमध्ये दिसून येतो. कामातील सातत्य टिकणे कठीण असले तरी ध्येयाने पछाडलेल्या मेष राशीच्या व्यक्ती झंझावात असतात. अशा या मेष राशीला २०२५ हे नववर्ष कसे असेल याचा आढावा घेऊ या.
वर्षभरातील महत्वाच्या ग्रहांचे राशी बदल
१८ मार्चला हर्षल आपल्या मेष राशीतून द्वितीय स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. २९ मार्चला शनि लाभ स्थानातील कुंभ राशीतून व्यय स्थानातील मीन राशीत प्रवेश करेल. १४ मे रोजी गुरू द्वितीय स्थानातील वृषभ राशीतून तृतीय स्थानातील मिथुन राशीत प्रवेश करेल. याच महिन्याच्या अखेरीस राहू व केतू वक्र गतीने अनुक्रमे लाभ स्थानातील कुंभ आणि पंचमातील सिंह राशीत प्रवेश करतील.
मेष राशीचे वार्षिक राशी भविष्य (Aries Annual Horoscope 2025)
जानेवारी ( January Horoscope 2025) :
नववर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात होईल. नवे संकल्प, नवे करार नव्या जोशात कराल. सातत्य टिकवल्यास खूप प्रगती होईल. मकर संक्रांत भरभरून समृद्धी देईल. नवी उमेद देईल. गुरुबल उत्तम असल्याने विद्यार्थी वर्गाच्या मेहनतीला यश मिळेल. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील आणि होतील. नोकरी व्यवसायात प्रगती कराल. मेहनतीशिवाय पर्याय नाही. शनिची साथ चांगली असल्याने कष्टाचे चीज होईल. संततीसंबंधित प्रयत्न फळास येतील. घरदार, स्थावर मालमत्तेचे व्यवहार पुढे सरकतील. वादविवादात आपले मुद्दे ठामपणे मांडाल. थंडीमुळे शिरा, नसा आखडणे,
पोटऱ्या, मांड्या भरून येणे असे त्रास उद्भवू शकतात. काळजी घ्यावी.
फेब्रुवारी ( February Horoscope 2025) :
पैशाला अनेक वाटा फुटतील. अनावश्यक खर्च टाळावा. छानछोकी, मौजमजा यावर अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता आहे. विदयार्थी वर्गाने प्रलोभने टाळावीत. अतिस्पष्ट बोलण्याचा परिणाम नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी दिसून येईल. थोडी सावधानी बाळगा. धीर धरा. जोडीदाराच्या अवास्तव मागण्यांवर नियंत्रण ठेवा. सुसंवाद साधण्याचा प्रयत्न कराल. गुंतवणूकदारांनी विशेष काळजी घ्यावी. सतर्कता बाळगावी. पैसा जमवायला काळ लागतो.गमवायला क्षणही पुरतो हे ध्यानात असू द्या. महाशिवरात्रीच्या निमित्ताने मनाची स्थिरता मिळवण्याचा प्रयत्न करावा. विवेकी विचार अमलात आणावेत.
मार्च ( March Horoscope 2025) :
१८ मार्चला हर्षल वृषभ राशीत प्रवेश करेल. तर महिनाखेरीस २९ मार्चला शनी व्यय स्थानातील मीन राशीत प्रवेश करेल. आर्थिक वर्षाच्या शेवटी गुंतवणूकीबाबत नवी गणिते शिकाल. सतर्कपणे पैशाने पैसे वाढवणे गरजेचे आहे. होळीच्या निमित्ताने मनाची अस्थिरता कमी करण्याचा संकल्प कराल तर गुढीपाडव्याला नव्या योजनांची मुहूर्तमेढ कराल. विद्यार्थ्यांचा परीक्षेचा काळ चांगला जाईल. ध्येयावर लक्ष केंद्रित कराल. नोकरी व्यवसायासाठी परदेश गमनाची संधी मिळेल. स्थावर मालमत्तेबाबतच्या गोष्टींना चालना मिळेल. विवाह ठरण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. प्रयत्नांना यश येईल. कामाच्या तणावामुळे डोकं शिणेल आणि थकवा जाणवेल.
एप्रिल ( April Horoscope 2025) :
राशी स्वामी मंगळ कमजोर होत आहे. मनोबल कमी होण्याची शक्यता आहे. पण १३ एप्रिलला रवी उच्च राशीत प्रवेश करेल. आत्मविश्वास वाढेल. महत्वाच्या भेटीगाठी, चर्चा सफल होतील. विद्यार्थी वर्गाला योग्य निर्णय घेता येईल. आकलनशक्ती वाढेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आपला प्रभाव पडेल. समोरच्याची चाल ओळखून त्याला नामोहरम कराल. विवाहोत्सुकांनी प्रयत्न सुरू ठेवावेत. घर, प्रॉपर्टी विषयक कामे रेंगाळतील. मोठी आर्थिक उलाढाल धोक्याची आहे. धनसंपत्तीचा विनियोग विचारपूर्वक करावा. अक्षय्य तृतीयेनिमित्त नवी खरेदी कराल. पित्त, डोकेदुखी आणि अपचनाचा त्रास वाढेल.
मे ( May Horoscope 2025) :
१४ मे रोजी गुरू मिथुन राशीत प्रवेश करेल. हा राशी बदल आपणास हितकारकच ठरेल. जवळचे लांबचे प्रवास योग येतील. महिना अखेरीस २९ मे रोजी राहू कुंभेत आणि केतू सिंहेत प्रवेश करेल. बराच काळ रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. परदेशासंबंधित कामांचा वेग वाढेल. बुद्ध पौर्णिमा विशेष लाभकारक ठरेल. परदेशी शिक्षणासाठी मार्ग मोकळा होईल. नोकरी व्यवसायानिमित्त प्रवास कराल. विवाह जुळेल. विवाहित दाम्पत्यांनी एकमेकांची साथसोबत करावी. नाते अधिक दृढ होईल. गुंतवणूकदारांना विशेष लाभ होतील पण गुंतवणुकीवरील आपली पकड ढिली होऊ देऊ नका. उष्णतेमुळे डोळ्यांचे त्रास होतील.
जून ( June Horoscope 2025) :
तंत्रज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान यांचा उपयोग अतिशय उत्तमरित्या कराल. विशेष वाचन आणि लेखन कराल. मनाजोगते शिक्षणक्षेत्र निवडता येईल. नोकरी व्यवसायात आपले मत प्रभावीपणे मांडाल. अतिरीक्त खर्चांवर नियंत्रण येईल. विवाह योग जुळून येतील. मनपसंत जोडीदार मिळेल. वटपौर्णिमा शुभ वार्ता घेऊन येईल. संतान प्राप्तीसाठीच्या प्रयत्नांना यश मिळेल. स्थावर इस्टेट याबाबतचे प्रश्न सुटण्यासाठी हालचाल कराल. सुरक्षित गुंतवणूक करावी. मोठी जोखीम पत्करू नका. कामातील सातत्य आणि ध्येय प्राप्तीची आस यामुळे चांगली उंची गाठाल. आतड्याला सूज येणे, इन्फेकॅशन होणे याची शक्यता आहे.
जुलै (July Horoscope 2025) :
अडचणीतून मार्ग काढत पुढे जाण्याची तयारी ठेवलीत तर कामे वेग घेतील. तंत्रज्ञानाला कलात्मकतेची जोड मिळेल. आषाढी एकादशी जगण्याचे नवे धडे शिकवेल तर गुरुपौर्णिमा ज्येष्ठांचे मार्गदर्शन प्राप्त करून देईल. नोकरी व्यवसायात वितंडवाद घालू नका. नातेवाईकांमध्ये आपली योग्यता कृतीतून दाखवाल. विवाहोत्सुकांचे विवाह जुळतील. गुंतवणूक करताना विशेष दखल घेतली नाहीत तर तोटा सहन करावा लागेल. जुने येणे वसूल होईल. अर्थात त्यामागे आपले अथक परिश्रम असतील. प्रॉपर्टीचे वाद सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. चंचल मन आणि अस्थिर विचार यांचा तब्येतीवर परिणाम होईल.
ऑगस्ट ( August Horoscope 2025) :
सणवार साजरे करण्यात पुढाकार घ्याल. उत्साह वाढेल. नारळी पौर्णिमा आणि जन्माष्टमीच्या कालावधीत महत्वाची कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. नोकरी व्यवसायात मोठी झेप घ्याल. परदेशासंबंधीत कार्य प्रगतीपथावर जाईल. हिंमत आणि जिद्द वाढेल पण शब्द जपून वापरावेत. नवी नाती जुळतील. ओळखीतून कामे होतील. नात्यामध्ये अधिकार गाजवू नका. न टाळता येणारे खर्च वाढतील. संतती प्राप्तीसाठीचे प्रयत्न फलद्रुप होतील. महिनाखेरीस गणेशाच्या आगमनाने खूप दिवस ज्या गोष्टीची वाट बघत असाल त्यासंबंधित बातमी समजेल. अपचनाचा आणि वाताचा त्रास वाढेल.
सप्टेंबर ( September Horoscope 2025) :
आपल्या हातून जी कर्म घडतात त्याचे फळ आपल्याला मिळते. पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या पितृपक्षात हातून सत्कर्म घडतील. दानधर्म कराल. विद्यार्थ्यांचा हा कसोटीचा कालावधी आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित केलेत तरच निभावून घ्याल. नोकरी व्यवसायात नव्या योजनांमध्ये सहभागी व्हाल. नव्या लोकांच्या ओळखी होतील. जोडीदाराचा सहवास आनंददायी असेल. संतानप्राप्तीचे योग आहेत. कामाच्या व्यापात तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी मिळणार आहे. अभ्यासपूर्वक गुंतवणूक करवी. नवरात्रीचा कालावधी आर्थिकदृष्ट्या लाभकारक ठरेल.
ऑक्टोबर ( October Horoscope 2025) :
‘दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा’. महिन्याची सुरुवातच दसऱ्याने होत असल्याने या महिन्यात खरोखरच आनंदाला तोटा नसेल. विद्यार्थी वर्ग एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करेल. नोकरी व्यवसायात अपेक्षित वार्ता कानी येतील. १८ ऑक्टोबरला गुरू कर्क राशीत प्रवेश करत आहे. गुरुबल कमजोर होत असले तरी उच्चीचा गुरू लाभकारक ठरेल. केवळ दीड महिन्यासाठीच गुरू कर्केत असेल. विवाहोत्सुकांचे विवाह योग सुरू आहेत. मनपसंद जोडीदार मिळेल. दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटाल. नव्या खरेदीचा आनंद काही औरच असेल. डोळे आणि पोट सांभाळा. औषधोपचारात चालढकल नको.
नोव्हेंबर (November Horoscope 2025) :
खर्चाला वेळेवर आळा घातला नाहीत तर महिन्याचा जमाखर्च कोलमडून पडेल. सावधगिरी बाळगा. नोकरी व्यवसायात मनाविरुद्ध घटना घडतील. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. विद्यार्थी वर्गाने सणावराच्या जल्लोषामधून आता बाहेर यावे. अभ्यासात एकाग्रता महत्वाची आहे. जमीनजुमल्याचे खटले थोड्या प्रमाणात मार्गी लागतील. विवाहोत्सुकांकडून शुभ वार्ता समजतील. ११ नोव्हेंबरपासून गुरू कर्क राशीत वक्री होणार आहे. मार्गी लागलेली काही कामे लांबणीवर पडतील. आळस भरणे, पोट जड होणे असे त्रास होण्याची शक्यती आहे.देवदिवाळीच्या सुमारास कामाचा ताण सुसह्य होईल.
डिसेंबर ( December Horoscope 2025) :
५ डिसेंबरला गुरू वक्र गतीने पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करेल. रवी आणि मंगळाच्या साहाय्याने आलेल्या परिस्थितीला हिमतीने तोंड द्याल. विद्यार्थी वर्गाने परीक्षेच्या तयारीला लागावे. विवाहोत्सुक मुलामुलींच्या विवाहाची लगबग सुरू होईल. विवाहित दाम्पत्यांना एकमेकांचा सहवास सुखावह ठरेल. नोकरी व्यवसायात शब्द थोडे जपून वापरावेत. आपल्या बोलण्यातून गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांसाठी दत्तजयंती मोठी पुंजी मिळवून देईल. पित्त आणि अपचनाने हैराण व्हाल. वातावरणातील बदलाचा तब्येतीवर परिणाम होईल.
अशा प्रकारे २०२५ हे वर्ष मेष राशीला खूप चांगले लाभ देणारे, उत्कर्षकारक असेल. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील.. होतील. जे संततीप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल. एकंदरीत गुरुबल चांगले असल्याने वर्ष प्रगतीकारक असेल.