22 January Horoscope : आज २२ जानेवारी २०२५ रोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी दुपारी ३ वाजून १९ मिनिटांपर्यंत राहील. स्वाती नक्षत्र रात्री २ वाजून ३५ मिनिटांपर्यंत जागृत असेल. तसेच आज धृती योग दुपारी ४ वाजून २६ मिनिटांपर्यंत जुळून येईल. राहू काळ दुपारी १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. तर बुधवार १२ राशींसाठी कसा जाणार हे आपण जाणून घेऊया…

२२ जानेवारी पंचांग व राशिभविष्य:

मेष:- छोटे प्रवास घडतील. एखादी विशेष व्यवस्था करावी लागेल. समजुतीत बदल होण्याची शक्यता. मनात आकर्षण भावना वाढू शकते. दिवस मनाजोगा जाईल.

Grah Gochar 2025 shukra gochar purva bhadrapad nakshatra
Grah Gochar 2025 : १ फेब्रुवारीपर्यंत फळफळणार ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब; शुक्राच्या नक्षत्र बदलाने संपत्तीत होईल प्रचंड वाढ, नांदेल सुख समृद्धी
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Surya and Mangal make pratiyuti yog 2025
१६ जानेवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार भरपूर यश अन् सूर्य-मंगळाच्या आशीर्वादाने नव्या नोकरीसह बक्कळ पैशाचा लाभ
Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
१८ वर्षांनंतर मित्र ग्रह शुक्र आणि राहूची युती! ‘या’ राशीच्या लोकांच्या नशीबाचे टाळे उघडणार, मिळेल अपार पैसा
Daily Horoscope 12 January 2025 In Marathi
१२ जानेवारी राशिभविष्य: रविवारी ब्रम्ह योग कोणत्या राशीसाठी ठरणार शुभ? कोणाची इच्छापूर्ती तर कोणाचे जुने प्रश्न लागतील मार्गी
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार! गुरु ग्रह होणार मार्गी, मिळेल पद-प्रतिष्ठा
The effect of the Sun's Mahadasha lasts for 6 years on a person
Surya Mahadasha: सूर्याच्या महादशेमुळे कोणत्या राशींचे नशीब चमकते करिअर अन् व्यवसाय? मिळते अपार धन-संपत्ती, ६ वर्षांसाठी राहतो प्रभाव
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार

वृषभ:- अचानक कौटुंबिक खर्च वाढू शकतो. घरात आनंदवार्ता मिळेल. दिवस चांगला जाईल. नवीन करार पूर्णत्वास जाईल. कौटुंबिक गोष्टीत दिवस जाईल.

मिथुन:- महत्त्वाच्या गोष्टीत जोडीदाराचा सल्ला घ्यावा. निकाल तुमच्या बाजूचा असेल. अचानक धावपळ करावी लागू शकते. घरात शिस्त बाळगाल. नातेवाईक भेटायला येतील.

कर्क:- तुमचे कौशल्य पणाला लावा. नोकरीत उत्साही वातावरण राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यावसायिक प्रगती करता येईल. प्रलंबित कामे मार्गी लावाल.

सिंह:- आपल्याला आवडणार्‍या गोष्टीत अधिक लक्ष घालाल. आत्मविश्वास वाढीस लागेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. मधुर वाणीने सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल.

कन्या:- आपल्यातील कालगुणांना वाव द्यावा. मात्र कौतुकाची फार अपेक्षा करू नका. समोरील जबाबदारी उत्तमरित्या पेलाल. एखाद्याकडून मदतीची अपेक्षा बाळगाल. नसत्या काळज्या करू नका.

तूळ:- आपले स्वत्व राखून बोलाल. बोलण्यात अधिकार वाणी ठेवाल. सामाजिक प्रतिष्ठा जपाल. एखादी भेटवस्तू मिळेल. मित्रांच्या मदतीने एखादी योजना आखाल.

वृश्चिक:- काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. जुनी उधारी वसूल होईल. मन प्रसन्न राहील. दिवसभरात काहींना काही लाभ मिळेल. तज्ञ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल.

धनू:- स्वत:वरील विश्वास कायम ठेवावा. व्यावहारिक फसणूकीपासून सावध रहा. काही समस्यांचे निराकरण होऊ शकते. कायदेशीर बाबीत सकारात्मकता दिसेल. कौतुकास पात्र व्हाल.

मकर:- अचानक धनलाभ संभवतो. आपल्या तत्वांना मुराद घालू नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. जोडीदाराशी क्षुल्लक गोष्टीवरून मतभेद होऊ शकतो. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

कुंभ:- वडीलधार्‍या व्यक्तींना नाराज करू नका. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. मित्रांचे भरपूर सहकार्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

मीन:- जुनी कामे मार्गी लावाल. जोडीदाराशी संघर्ष टाळावा. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. नोकरदारांना दिवस चांगला जाईल. सासुरवाडीची मदत मिळेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader