Aries To Pisces Horoscope Today, 14 April 2025 : १४ एप्रिल २०२४ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी आज ८ वाजून २६ मिनिटांपर्यंत राहील. त्याच्यानंतर द्वितीया तिथी सुरु होईल. स्वाती नक्षत्र रात्री १२ वाजून १०१४ मिनिटांपर्यंत जागृत असेल. तर वज्र योग रात्री १० वाजून ३८ मिनिटांपर्यंत जुळून येईल. आज राहू काळ ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. आज सकाळी ६ वाजून ३४ मिनिटांनी , शुक्र मीन राशीत थेट प्रवेश करणार आहे. तर आज कोणाचा सुवर्णकाळ सुरु होईल तर कोणाला फायदा होईल हे आपण जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

१४ एप्रिल पंचांग व राशिभविष्य ( Today’s horoscope for zodiac signs)

मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)

तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. सरकारी कामे मार्गी लागतील. कामातील बदल जाणून घ्यावेत. मौल्यवान वस्तु जपून ठेवाव्यात. आवडीचे पदार्थ चाखाल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)

जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. साहित्याची आवड जोपासता येईल. भावंडांना बाहेर गावी जाण्याचं योग येईल. मैत्रीतील आपुलकी वाढेल. फार दूरचे विचार करू नका.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)

क्षणिक सौख्याचा आनंद घ्याल. मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने मार्गक्रमण कराल. व्यापारात चांगला लाभ होईल. कमिशनचा लाभ उठवावा.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)

स्त्री वर्गाचा सहवास लाभेल. नवीन मित्रा जोडले जातील. पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)

घरासाठी सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. तुमच्या कलागुणांचे कौतुक केले जाईल. महिलावर्ग मनाजोगी खरेदी करेल. चांगले साहित्य वाचनात येईल. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)

चारचौघांत तुमची कला सादर करता येईल. योग्य विचारांची जोड घ्यावी. धार्मिक साहित्य वाचाल. इतरांना मना पासून मदत कराल. मनात नवीन कल्पना रुजतील.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)

अचानक धनलाभ संभवतो. लॉटरीचे तिकीट घ्याल. घरगुती प्रश्न समजून घ्यावेत. अपचनाचा त्रास जाणवेल. हातातील कामे पूर्ण होतील.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)

पत्नीचे प्रेमळ सौख्य लाभेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा दबदबा वाढेल. कामातून आत्मिक समाधान लाभेल. व्यवसाय वृद्धीचा मार्ग आखावा. मुलांचा खोडकरपणा वाढेल.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)

कौटुंबिक खर्चाचे गणित नव्याने मांडावे. मित्र मंडळींचा गोतावळा जमवाल. बोलण्याचा भरात नवीन जबाबदारी अंगावर घ्याल. हाताखालील लोकांकडून कामे करून घ्याल. जुगाराची आवड जोपासाल.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)

पित्ताचा विकार जाणवेल. कामाचा फार ताण घेऊ नका. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. स्वत: मध्ये काही बदल करून पहावेत. कामातील अडथळे प्रयत्नपूर्वक दूर करावेत.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)

सामाजिक बांधीलकी जपावी. वादावादीत सहभाग घेऊ नका. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. धाडसाने कामे पूर्ण कराल. तुमची हिम्मत वाढीस लागेल.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)

मित्रांचा रोष वाढवून घेऊ नका. अधिकारी व्यक्तीचा सल्ला विचारात घ्या. मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. मानसिक चंचलता जाणवेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aries to pisces horoscope today in marathi 14 april 2025 shukra gochar impact on zodiac signs asp