Aries To Pisces Horoscope Today in Marathi : आज पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी रात्री ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत राहील. ध्रुव योग संध्याकाळी ६ वाजून ५९ मिनिटांपर्यंत राहील. तसेच पूर्वाषाढा नक्षत्र मंगळवारी १२ वाजून ४ मिनिटांपर्यंत राहील. राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. पूर्वाषाढा नक्षत्र हे आकाशातील २७ नक्षत्रांपैकी २० वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे पूर्वाषादा नक्षत्रात शुक्राचार्याची (शुक्राची) पूजा करावी. तर आज २०२४ या वर्षाचा शेवटचा दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…
३१ डिसेंबर पंचांग व राशिभविष्य :
मेष:- भविष्याची फार चिंता करू नका. जवळच्या नातेवाईकाचा सल्ला मोलाचा ठरेल. काही प्रश्न लवकरच निकालात निघतील. तुमच्या समस्यांचे निराकरण होईल. मानसिक दृष्ट्या सक्षम बनाल.
वृषभ:- भावंडांसोबत वेळ मजेत घालवाल. मनात उगाच नसत्या चिंता आणू नका. वेळेचा सदुपयोग करावा. देवाणघेवाण करताना सावध राहावे. लहान भावाला दूर गावी जावे लागेल.
मिथुन:- आज सुखद अनुभव येतील. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. कौतुकाने अधिक चांगली प्रेरणा मिळेल. भावंडांसोबत नवीन काम सुरू करू शकता. चर्चा सकारात्मक असेल.
कर्क:- वायफळ बडबड करणार्यांपासून दूर राहावे. आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करावे. घरातील कामासाठी थोडा वेळ काढावा लागेल. दिवस धावपळीत जाईल. एखादी नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते.
सिंह:- आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतील. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. प्रवासात वेळेचे भान राखावे. परोपकाराची जाणीव ठेवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.
कन्या:- आज दिवस संमिश्र जाईल. अनपेक्षित लाभ मिळू शकतात. मात्र फार हुरळून जाऊ नका. द्विधा मनस्थितीतून बाहेर यावे. अति विचार करणे टाळावे.
तूळ:- शत्रूलाही आज मित्र बनवू शकाल. इतरांवर तुमची चांगली छाप पडेल. कामाच्या ठिकाणी आज चांगले परिणाम पहायला मिळतील. पत्नीला खुश करता येईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
वृश्चिक:- आज मनाची संवेदनशीलता दाखवाल. शब्दांचे वजन लक्षात घ्यावे. लहान सहान गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल. अभ्यासातून मन विचलीत होऊ देऊ नका.
धनू:- आजचा दिवस प्रसन्नतेत जाईल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. प्रेमी युगुलांना दिवस सुखद जाईल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल.
मकर:- आपली क्षमता ओळखून काम करावे. आळस झटकावा लागेल. अति स्पष्ट बोलणे टाळावे. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. कामाचा उरक वाढवावा.
कुंभ:- जवळचा प्रवास चांगला होईल. तुमच्या हातातील काम पूर्ण होईल. अधिक धीटपणे काम कराल. पराक्रमाला चांगला वाव आहे. नातेसंबंधात सुधारणा होईल.
मीन:- आपले मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी ध्यान करावे. व्यायामाला कंटाळा करू नका. आवडते पदार्थ खाल. घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करावी. कौटुंबिक सौख्यात भर पडेल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
© IE Online Media Services (P) Ltd