Daily Horoscope In Marathi : १२ जानेवारी २०२५ रोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी आहे. चतुर्दशी तिथी रविवारी संपूर्ण दिवस आणि सोमवारी पहाटे ५ वाजून ०३ मिनिटांपर्यंत राहील. १२ जानेवारीला ब्रम्ह योग सकाळी ९ वाजून ९ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर इंद्र योग जुळून येईल. तसेच मृगाशिरा नक्षत्र दुपारी ११ वाजून २५ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. राहू काळ सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत राहील. तर १२ राशींचा रविवार हसत-खेळत जाणार की धावपळीचा हे आपण जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१२ जानेवारी पंचांग व राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope Today in Marathi) :

मेष:- कामात घाई गडबड करू नका. आजचा दिवस शुभ आहे. दिवसभर धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल. उत्तम वर्तनाने सर्वांना आपलेसे करून घ्याल.

वृषभ:- घरातील कामे वेळेवर आटोपती घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल. करमणुकीकडे कल वाढेल. हातातील कामात यश येईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीने मन आनंदी होईल.

मिथुन:- कामातील अपेक्षितता वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. दिवस चांगला जाईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

कर्क:- उधारी वसूल व्हायला सुरुवात होईल. धनवृद्धीचे योग जुळून येतील. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. सारासार विचार करावा.

सिंह:- बोलताना आक्रमक शब्द वापरू नका. जुनी कामे विनासायास पूर्ण होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आहारावर विशेष नियंत्रण ठेवा. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.

कन्या:- खर्च समाधानकारक असेल. मानसिक शांतता लाभेल. विरोधक नामोहरम होतील. वैवाहिक जीवन संमिश्र राहील. काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील.

तूळ:- एखादी गोष्ट संभ्रमित करू शकते. मित्राचा सल्ला घ्याल. मत मांडताना थोडासा विचार करावा. काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील. जोडीदाराचे उत्तम सान्निध्य लाभेल.

वृश्चिक:- झोपेची तक्रार जाणवेल. संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. बोलताना तारतम्य बाळगावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

धनू:- घरासाठी खरेदी केली जाईल. आनंदाची अनुभूति घ्याल. सांसारिक सौख्यात वाढ होईल. मानसिक शांतता लाभेल. भावंडांशी स्नेहभाव वाढेल.

मकर:- अचानक उद्भवणार्‍या खर्चावर आळा घालावा. घरात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल. गोड बोलून कामे करून घ्याल. वाहन विषयक कामे निघतील. फार गरज नसेल तर प्रवास टाळावा.

कुंभ:- जुने प्रश्न मार्गी लावाल. किरकोळ समस्या सोडवू शकाल. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. अचानक खर्चात भर पडू शकते. हातातील अपूर्ण कामाकडे आधी लक्ष द्यावे.

मीन:- उगाच रागराग करू नका. वैवाहिक समस्यांकडे लक्ष द्यावे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तणाव दूर होऊ शकेल. कामातील उत्साह वाढेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aries to pisces horoscope today on 12 january which zodiac signs wish will be fulfilled and whos worries will be solve asp