Daily Horoscope 24 December 2024 in Marathi : २४ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. नवमी तिथी मंगळवारी संध्याकाळी ७ वाजून ५३ मिनिटांपर्यंत राहील. शोभन योग रात्री८ वाजून ५४ मिनिटांपर्यंत राहील. तसेच हस्त नक्षत्र मंगळवारी दुपारी १२ वाजून १७ मिनिटांपर्यंत राहील. याशिवाय सकाळी ८ वाजून २६ मिनिटांनी बुध ग्रहाचा ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश होणार आहे. तर राहू काळ दुपारी ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजेपर्यंत असणार आहे. तर बुधाचा ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश १२ पैकी कोणत्या राशीसाठी सुख-समृद्धीचा ठरेल हे आपण जाणून घेऊया…

२४ डिसेंबर पंचांग व राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope Today in Marathi) :

मेष:- सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आजूबाजूच्या लोकांना बरोबर घेऊन चालाल. धार्मिक कार्याची आवड निर्माण होईल. कुटुंबातील लोकांसमवेत प्रवास कराल. आर्थिक प्रगती साधता येईल.

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला मिळेल प्रार्थनेचे फळ तर व्यवसायिकांचा असेल सोन्याचा दिवस, वाचा तुमचे राशिभविष्य
Shukra Nakshatra parivartan 2024
उद्यापासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर
10 December Mesh To Meen Horoscope in Marathi
१० डिसेंबर पंचांग: आज वृषभसह ‘या’ राशींच्या कुंडलीत धनलाभाचा योग; आज काय घडल्याने १२ राशींचे मन होईल प्रसन्न? वाचा मंगळवारचे राशिभविष्य
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा

वृषभ:- आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात. व्यायामाला कंटाळा करू नका. अचानक धनलाभाची शक्यता. वैवाहिक जीवनात सुसंवाद ठेवावा. फार काळजी करत बसू नये.

मिथुन:- लहान व्यवसायिकांना लाभ होईल. सामाजिक व्याप्ती वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल. जोडीदाराबरोबर मजेत वेळ घालवाल. तुमचे विचार सकारात्मक ठेवा.

कर्क:- कार्यक्षेत्रात सावधानता बाळगा. विरोधकांपासून सावध राहावे. कोणावरही जास्त विश्वास ठेऊ नका. सामाजिक स्तरावर बोलताना भान राखावे. कोणालाही शब्द देऊ नका.

सिंह:- प्रेम जीवनात सुखद अनुभव मिळतील. सहवासाचा आनंद लुटाल. मनातील भावना मांडता येतील. आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील.

कन्या:- आज देवीचा आशीर्वाद मिळेल. मनातील इच्छेला मूर्त रूप द्याल. कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल. कामाच्या ठिकाणी एकाग्रता ठेवावी. घरातील टापटीप कटाक्षाने पाळाल.

तूळ:- आज तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. विना संकोच बोलाल. जवळच्या मित्रांना घरी बोलवाल. निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्याल. खाण्यावर नियंत्रण ठेवावे.

वृश्चिक:- बोलण्यातून सामाजिक मान वाढेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. आवडीचे पदार्थ चाखाल. कौटुंबिक जीवनात काही सुखद अनुभव येतील. दिवस मनाजोगा घालवाल.

धनू:- आज आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी कराल. आवडते छंद जोपासाल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. बुद्धिमत्ता आणि विवेक यांचा मेळ घालावा. सूक्ष्म निरीक्षणावर भर द्यावा.

मकर:- आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खर्चात वाढ संभवते. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. ध्यानधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करावे. कचेरीची महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कुंभ:- आजचा दिवस आनंदात जाईल. बरेच दिवस रेंगाळत असलेली इच्छा पूर्ण होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. मित्रांची उत्तम साथ मिळेल. व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होईल.

मीन:- कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. सहकार्‍यांशी होणारे मतभेद संपुष्टात येतील. खेळीमेळीचे वातावरण राहील. घाईघाईने निर्णय घेऊ नका. घरासाठी थोडा वेळ काढावा लागेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader