Aries To Pisces Horoscope Today : २१ जानेवारी २०२५ रोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत राहील. तसेच उद्यापर्यंत ३ वाजून ४९ मिनिटांपर्यंत धृती योग जुळून येईल. तसेच चित्रा नक्षत्र रात्री ११ वाजून ३६ मिनिटांपर्यंत जुळून येईल. आज राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. याशिवाय सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी मंगळ मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल. तर आजचा दिवस मेष ते मीनसाठी कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…

२१ जानेवारी पंचांग व राशिभविष्य (Mesh To Meen Horoscope:

मेष:- घरातील वातावरण चांगले राहील. मुलांसोबत मजेत वेळ घालवाल. काही धार्मिक विधींनी मनाला शांति मिळेल. प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस. मनातील इच्छा बोलून दाखवाल.

Surya and Mangal make pratiyuti yog 2025
१६ जानेवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार भरपूर यश अन् सूर्य-मंगळाच्या आशीर्वादाने नव्या नोकरीसह बक्कळ पैशाचा लाभ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Daily Horoscope 13 January 2025
१३ जानेवारी पंचांग: शाकंभरी पौर्णिमेला छोटासा बदल ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक; कोणाची नाती घट्ट तर कोणाला होणार धनलाभ; वाचा राशिभविष्य
security beefed up around z morh tunnel
‘झेड मोढ’ बोगद्याभोवती सुरक्षा व्यवस्थेत वाढ; पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या उद्घाटनाची शक्यता
Daily Horoscope 12 January 2025 In Marathi
१२ जानेवारी राशिभविष्य: रविवारी ब्रम्ह योग कोणत्या राशीसाठी ठरणार शुभ? कोणाची इच्छापूर्ती तर कोणाचे जुने प्रश्न लागतील मार्गी
The effect of the Sun's Mahadasha lasts for 6 years on a person
Surya Mahadasha: सूर्याच्या महादशेमुळे कोणत्या राशींचे नशीब चमकते करिअर अन् व्यवसाय? मिळते अपार धन-संपत्ती, ६ वर्षांसाठी राहतो प्रभाव
What is Kinkrant| Sankrant and Kinkrant Difference
Kinkrant 2025: किंक्रांत म्हणजे काय? का पाळला जातो हा दिवस; जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक
The luck of these zodiac signs will shine on January 28th
२८ जानेवारीला चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, शुक्र ग्रह निर्माण करणार मालव्य राजयोग!

वृषभ:- आपल्याला हवी असणारी उत्तरे मिळतील. नवीन योजनांसाठी अधिक वेळ द्यावा लागेल. पुढील गोष्टींचे नियोजन करावे लागेल. मानसिक शांतता लाभेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

मिथुन:- जुनी उधारी वसूल होईल. घरातील वातावरण चांगले राहील. जवळच्या ठिकाणी प्रवास घडेल. भावंडांची चांगली मदत होईल. कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील.

कर्क:- मानसिक चंचलता जाणवेल. नवीन कामासाठी चांगला वेळ. हातातील काम फलदायी असेल. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल. व्यापारी वर्गाला चांगला दिवस.

सिंह:- व्यावसायिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवा. दिवस आपल्या मनासारखा घालवाल. कार्यक्षेत्रात वाढीव मेहनत घ्यावी लागेल. वडिलांचे सहकार्य प्राप्त होईल.

कन्या:- मित्रांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. घरात धार्मिक वातावरण राहील. बोलताना तारतम्य बाळगा. संयमाने परिस्थिती हाताळावी. कौटुंबिक खर्चाला आळा घालावा.

तूळ:- आपल्याच धुंदीत दिवस घालवाल. स्वत:चेच म्हणणे खरे कराल. मनातील इच्छेला अधिक महत्त्व द्याल. नवीन प्रकल्पावर काम सुरू करावे. व्यावसायिकांना चांगला लाभ होईल.

वृश्चिक:- अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणुकीला चांगला काळ आहे. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. कामातील समस्या दूर होतील. नवीन ओळख होईल.

धनू:- नातेवाईकांच्या होकारात होकार मिसळू नका. स्वत: तारतम्य बाळगून विचार करावा. कामाच्या ठिकाणी फक्त आपल्या कामाकडेच लक्ष द्यावे. राजकारणापासून दूर राहावे. मित्रांसाठी मदतीचा हात पुढे कराल.

मकर:- काम आणि वेळ यांचा समन्वय साधावा. चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालू नका. नियमांचे काटेकोर पालन करा. अति विचार करत बसू नका. भावंडांची बाजू समजून घ्यावी.

कुंभ:- कामाच्या बदललेल्या स्वरूपाशी जुळवून घ्या. समोरच्या व्यक्तीचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. व्यापारी वर्गाला चांगला दिवस. भागीदारीच्या व्यवसायात काटेकोर राहावे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

मीन:- अंग मेहनतीला मागे हटु नका. मित्रांची बरेच दिवसांनी गाठ पडेल. नवीन संपर्कातून काही गोष्टी समोर येतील. नोकरदारांना दिवस समाधानकारक जाईल. संयमाने कामे करावीत.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader