Lucky Numbers as Per Birthdate: संख्याशास्त्रात विविध बाजूंचा विचार करताना भाग्यांकाचाही विचार करणे खूप आवश्यक आहे. मूलांकाला भाग्यांकाची साथ लाभते तेव्हा जीवनातील खूप खोलवर गोष्टीचा उलगडा होत जातो. मागील लेखात आपण आपल्या जन्मतारखेवरून आपला भाग्यांक कसा शोधायचा हे पाहिले.आता या लेखात आपण भाग्यांक १ ते ५ असणाऱ्या मंडळींचा ज्योतिषशास्त्रानुसार स्वभाव तसेच भाग्योदयाचा काळ कधी व कसा असतो हे पाहणार आहोत. भाग्यांक कसा ओळखावा याविषयी आपल्यास संभ्रम असेल तर आधी इथे क्लिक करा आणि मग आपल्या भाग्यांकावरून स्वभाव पाहा.

तुमचा भाग्यांक तुमच्या स्वभावाविषयी काय सांगतो?

भाग्यांक एक

भाग्यांक एक असलेल्या व्यक्ती अतिशय न्यायबुद्धीने वागणाऱ्या असतात आणि आपल्या अधिकाराचा वापरही उत्तम तऱ्हेने करतात. स्वभाव अतिशय मनमोकळा, स्वतंत्र विचारसरणी त्यामुळे राजकीय सामाजिक क्षेत्रात यांना खूप मानाचे स्थान लाभते. जर या एक भाग्यांकाचा मूलांकही जर एक असेल तर अशा व्यक्ती उद्योगधंद्यात नोकरीत खूप उत्तम तऱ्हेने प्रगती सादातात मात्र यांच्या मध्ये कोणी हस्तक्षेप केलेला यांना बिलकूल आवडत नाही. तर यांच्या जन्मतारखेला मूलांक चार असेल तर यांच्या लहरी स्वभावानुसार यांचे कामाचे प्रयोजन असते तर कधी यांच्या प्रेमप्रकरणात भावुकतेचा अतिरेक होत असतो. तर यांचा मूलांक नऊ असेल तर अशा व्यक्ती वागण्या बोलण्यात अतिशय गंभीरतेने वागतात. अतिशय शिस्तप्रिय असतात. आयुष्यात येणाऱ्या विपरित प्रसंगात विचलित होत नाहीत. त्वरित स्वत:ला सावरतात.

Samsaptak Yog 2025
मिथुन राशीमध्ये निर्माण होतोय समसप्तक, ‘या’ ३ राशींच्या लोक जगतील सुख-समृद्धीचे जीवन, आयुष्यात होईल आनंदी आनंद
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Mercury in Pisces will create Nichbhang Rajayoga
पैसाच पैसा! बुध ग्रह मीन राशीत निर्माण करणार नीचभंग राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ
Rahu's entry into Saturn's Nakshatra
राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख
people born on this date are so rich and wealthy
‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात अत्यंत धनवान अन् श्रीमंत, आयुष्यात कमावतात गडगंज संपत्ती
Shadashtak Yog 2025
आजपासून बुध-मंगळ निर्माण करणार षडाष्टक योग; ‘या’ तीन राशीचे व्यक्ती भरपूर पैसा कमावणार
Surya Dev Lucky Rashi
Surya Dev Lucky Rashi : ‘या’ तीन राशींवर असते सूर्य देवाची विशेष कृपा, जीवनात मिळते अपार धन संपत्ती अन् यश
From February 24 the luck of people born under this zodiac sign
२४ फेब्रुवारीपासून ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार! मंगळ होणार मार्गी, मिळणार पैसाच पैसा

एकूण या भाग्यांक एकला खूप मित्रपरिवार लागतो. आयुष्यात येणाऱ्या संधीचे ते सोने करतात. अतिशय मेहनत घेणे, कामाचा आशय पूर्ण समजून घेणे ,योग्य तो निर्णय घेणे. मूळात स्वतंत्र वृत्ती प्रबळ इच्छा शक्ती यातून या व्यक्ती सहज यशाकडे झेप घेतात.

भाग्यांक दोन

या भाग्यांकानी आनंदाशी आपले थेट नाते जोडलेले असते. विशेषत: उत्तम वक्तृत्व आणि बोलण्याची एक विशिष्ट लकब यातून या व्यक्ती समोरच्या व्यक्तीवर उत्तम छाप पाडतात. यांची नीटनेटके काम करण्याची पद्धत आणि उत्तम कामाचा उरक यातून हे उद्योग धंद्यात नोकरीत अडचणीच्या काळात सदैव पुढे असतात. कुठल्याही विपरित प्रसंगात स्वत:ला सावरून सुरक्षित मार्ग काढण्याचे यांचे कसब फार वेगळे असते. या कारणाने या व्यक्ती समाजात अतिशय लोकप्रिय ठरतात. तसेच मित्रमंडळीच्या समुदायात मिळून मिसळून असतात. समूहापासून दूर असणे यांना बिलकूल जमत नाही. आपल्या आजूबाजूला चार माणसे असावीत यात हे मोठा आनंद मानतात. मात्र अशा लोकांनी प्रेम प्रकरणात भावनावश होऊन आपले सर्वस्व उधळून लावण्याचा विचार कधीही करू नये. कारण यांच्या समोरील व्यक्तीला त्यात काही स्वारस्य नसते. हे मात्र त्या प्रेमाच्या भोवऱ्यात स्वत:ला फिरवत राहून आयुष्यात असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी गमावून बसतात. तेव्हा यांनी ही सावधानतेची सूचना जरूर पाळावी. यांच्या जन्मतारखेत मूलांक दोन किंवा सातची उपस्थिती असेल तर मनाचा गोंधळ अधिक वाढेल. तर मूलांक एकची उपस्थिती उत्तम शिस्त देईल. तसेच मूलांक नऊच्या सहवासामुळे क्रोधाचे प्रमाण वाढेल तर मूलांक तीनच्या सहवासातून यांच्या मनाचा समतोलपणा उत्तम जपला जाईल.

भाग्यांक तीन

या व्यक्ती मूळातच आशावादी व स्वतंत्र विचाराच्या असतात. त्यामुळे काही विशिष्ट नीतीमूल्ये जपून आपली कामे करीत असतात. उत्तम संवाद साधणे, उत्तम वक्तृत्व आणि आदर्श शिक्षक या गोष्टी यांच्यापाशी उपजत आलेल्या असतात. विशेष म्हणजे आयुष्यातील विश्वसनीय गोष्टी तपासताना वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेवून त्यावर खोलवर विचार करून आपली मते मांडतात. धाक दबावाला या व्यक्ती बिलकूल घाबरत नाहीत तसेच योग्य माणसे हेरून त्यांच्यातील कल्पकता कृतीत आणण्यासाठी यांचा प्रयत्न नेहमी यशस्वी ठरतो. यांच्या स्वाभिमानी वृत्तीचे दर्शन यांच्या विनयशील पण रोखठोक बोलण्यातून दिसून येते. या लोकांचा सत्यता न्याय यावर प्रचंड विश्वास असतो. त्यामुळे अन्यायाच्या काळोखात चाचपडत राहणाऱ्या लोकांना त्यातून बाहेर काढून मदत करतात. सहृदयता सात्विकता धार्मिक वृत्ती मानून हे सामाजिक कार्यात मोठे योगदान देत असतात. धार्मिक संस्था ट्रस्ट यामधून यांची नित्य लोकसेवा सुरू असते.

यांच्या जन्मतारखेला सतत येणारा तीन अंक पोटाचे अपचनाचे आजार देईल यासाठी यांनी पथ्य व जेवणाच्या वेळा सांभाळाव्यात. तसेच मूलांक सहा व सात हे अंक यांना सदैव मदतीचे ठरतात. यांनी अतिमहत्वकांक्षा जरूर ठेवाव्यात. पण अहंकार बाजूला ठेवून, म्हणजे यांचा यशाचा मार्ग अधिक सोपा होतो.

भाग्यांक चार

हा अंक बुद्धीमान चौकस बुद्धीचा आहे पण सर्व सद्गुणांचा वापर लोकोपयोगासाठी करीत असतात. अतिशय चाकोरीबद्ध जीवन – तरीही यांना वादविवाद संघर्षाला सामोरे जावे लागते. पण हे सारे शांतचित्ताने हाताळून सहजपणे त्यातून बाहेर पडतात. राहणीमान साधे, प्रसन्न चेहरा, स्मित हास्य बोलण्यात अतिशयोक्तीचा लवलेश नाही. निव्वळ साधेपणाने राहणे पण विचाराची उत्तम श्रीमंती आणि बुद्धीची व्यापकता हे यांचे सद्गुण चलनी नाण्यासारखे असतात. पेशाने वकील असो वा शास्त्रज्ञ किंवा सामान्य नोकरीकर्ता असो यांच्या वागण्यात कुठेही अहंपणाचा अंश दिसत नाही. श्रम आणि जिद्द यातून हे आपले यश सिद्ध करतात वादविवादात दोन्ही गटांना आपले विचार समजावून देऊन त्यांना एकत्र आणणे यांना उत्तम जमते. जर जन्म तारखेत मूलांक एकची उपस्थिती असेल तर चाार भाग्यांकाचा आत्मविश्वास अधिक वाढतो. नावलौकिक होतो. तसेच दोन व सातची मूलांक रुपाने उपस्थिती असेल तर मानसिकता अस्थिरता हळवेपणा वाढतो. तर सहा व आठ अंकाच्या उपस्थिततीतून नव्या बारीकसारीक समस्या त्रास देतात. एकंदरीत आपण बुद्धीमान विचारी असलो तरी मनाची फूटपट्टी बदलता येत नाही.

हे ही वाचा<< गजलक्ष्मी राजयोग बनल्याने ‘या’ राशींच्या नशिबात अपार धन- संपत्ती? पेढ्यांसारखा गोड होणार तुमचा ऑगस्ट महिना

भाग्यांक पाच

पाच या भाग्यांकावर जरी बुध ग्रहाचा प्रभाव असला तरी पूर्ण जन्मतारखेतील विविध अंकांचा प्रभाव या भाग्यांकात एकवटलेला असतो. या पाच अंकात पूर्ण जन्मतारखेतील अंकाची स्पंदने एकत्र आलेली असतात. त्यामुळे विविध गुणाच्या संस्कारातून हा अंक तयार होतो. तसेच पूर्ण जन्मतारखेत जर पाच अंकाचे अस्तित्व जास्त असेल तर या पाच अंकाची स्पंदने अधिक प्रभावी होऊन ती जास्त परिणामकारक ठरतील. हा पाच अंक उत्तम बुद्धीमत्तेचे प्रतिक म्हणून मानला जातो. उत्तम वक्तृत्व, मधुर वाणी यांची यांना स्वत:च्या कामात खूप मदत होते. तसेच प्रसंगी धडाडीने पुढे जाण्याची हिंमत यांच्यापाशी उत्तम असते. विचार करण्याची तऱ्हेवाईक पद्धत त्यातून नवीन नवीन कल्पना सुचत असतात यामुळे यांच्या बुद्धीचे कौतुक होत असते. पण यांच्यातील आळशी स्वभावामुळे खूपसे विचार मूर्त स्वरुपात येत नाहीत. यांनी जर मूलांक सहाची मदत घेतली तर यांच्या कामांना उत्तम गती प्राप्त होईल आणि आर्थिक उन्नती होईल. तसेच मूलांक चारही यांच्या कामात मदतीचा ठरेल. अति बौद्धिक किचकट कामात तो उत्तम सहकार्य देईल. शक्य तो नऊ अंकाची गरज भासू देऊ नये. मात्र मूलांक एक हा अंक खऱ्या अर्थाने मदतीचा ठरेल. खूपशा गोष्टी कृतीत उतरतील.

(टीप: भाग्यांक सहा ते नऊ याविषयीचे ज्योतिषीय विश्लेषण पाहण्यासाठी लोकसत्ताच्या राशीवृत्त पेजला भेट देण्यास विसरू नका)

Story img Loader