शहरामध्ये असलेल्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक लोकांना रात्री पुरेशी झोप घेता येत नाही. सर्व प्राणी कमी अधिक काळ झोपतात. सरडा, साप, पक्षी आणि सस्तन प्राणी तुलनेने अधिक काळ झोपतात. मासे एका वेळी फक्त दहा ते पंधरा सेकंद झोपतात. साप आणि मासे यांच्या डोळ्यावर पापण्या नसतात ते डोळे उघडे ठेवून झोपतात. घोडा उभ्याने थोडा थोडा वेळ झोपतो. कुत्रा, लांडगा, सिंह, वाघ असे शिकारी प्राणी अधिक वेळ झोपतात. तर हरणे ससे यासारखे प्राणी कमी वेळ झोपतात. निशाचर प्राणी दिवसा तर दिनसंचारी प्राणी रात्री झोपतात. असं असताना मनुष्य प्राण्यावर कमी झोपेचे दुष्परिणाम नुसते मनावरच नाही तर शरीरावरदेखील होतात. रात्री पुरेशी झोप झाली नाही, तर त्याचे परिणाम येणाऱ्या दिवसाच्या कामावर होतात. त्यामुळे चांगली झोप मिळणं गजरेचं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, चांगल्या झोपेसाठी दिशांचे ज्ञान आवश्यक आहे. हिंदू पौराणिक ग्रंथांमध्येही चांगल्या झोपेबाबत अनेक सूचना देण्यात आल्या आहेत. चला तर मग आज जाणून घेऊया चांगल्या झोपेसाठी काय आवश्यक आहे आणि काय नाही?
रोज रात्री सुमारे सहा तासांची झोप घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. यामुळे आपले रक्ताभिसरण बरोबर राहते आणि दुसऱ्या दिवशी शरीरात ताजेपणा आणि ऊर्जा राहते.वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपणे सर्वोत्तम मानले जाते. असे मानले जाते की दक्षिण दिशेला पाय ठेवून झोपल्याने झोप लागत नाही आणि रात्रभर अस्वस्थता राहते. पूर्व दिशाही झोपण्यासाठी चांगली आहे. पूर्व दिशा ही उगवत्या सूर्याची दिशा आहे. त्यामुळे या दिशेला पाय ठेवून झोपणे वर्ज्य मानले जाते. पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय ठेवून झोपल्याने झोपेचा चांगला अनुभव येऊ शकतो.विवाहित लोकांसाठी दक्षिण, दक्षिण-पूर्व किंवा नैऋत्य दिशेला डोके ठेवून झोपणे सर्वोत्तम मानले जाते.
Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेले लोक असतात धैर्यवान आणि उत्साही; मंगळाची असते विशेष कृपा
झोप म्हणजे काय?
शरीराच्या इतर क्रियांप्रमाणेच झोप ही क्रिया आहे. मानेच्या भागातील पेशींमध्ये झोपेचे संकेत निर्माण होतात. तेथून मज्जारज्जूद्वारे शरीरातील सर्व अवयवांना मंदावण्याचे संकेत जातात. मेंदूच्या इतर भागांनाही हे संकेत जातात. त्यानंतर झोपेचा पहिला प्रकार म्हणजे ‘स्लो वेव स्लीप’ची सुरुवात होते. साधारण तासाभराने दुसरा प्रकार सुरू होतो. यामध्ये डोळ्यांची बुब्बुळे हलतात म्हणून त्याला ‘रॅपिड आय मूव्हमेंट’ किंवा ‘आरईएम’ म्हणतात. या दरम्यान मांसपेशीतील ताण वाढतो आणि शरीराच्या काही हालचाली होतात. या झोपेच्या टप्प्यात शरीर आणि अवयव नेहमीपेक्षा जास्त उत्तेजित होतात. हा टप्पा मेंदूच्या आरामासाठी महत्त्वाचा असतो. रात्रभर हे दोन प्रकार आलटून-पालटून घडतात. स्लो वेवचा कालावधी कमी होत जातो आणि आरईएमचा वाढत जातो.