Angarki Aankashti Chaturthi 2024 : गणपती बाप्पाला आराध्य दैवत मानले जाते. तंयात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते. यावेळी सर्व समस्यांपासून मुक्ती मिळावी यासाठी उपवास करून, गणेशाची विधिवत पूजा केली जाते. त्यात कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. विशेष म्हणजे जून महिन्यात संकष्टी चतुर्थी मंगळवारी आल्याने ही संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणूनही साजरी होणार आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचीही परंपरा आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते. आषाढ महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त, चंद्रोदयाची वेळ अन् पूजा विधी याविषयी जाणून घेऊ.
कधी आहे कृष्णपिंगल अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२४?
हिंदू दिनदर्शिकेनुसार, कृष्ण पक्षातील अंगारकी संकष्टी चतुर्थी २५ जून २०२४ रोजी येत आहे.
संकष्टी चतुर्थी २०२४ शुभ मुहूर्त (Angarki Sankashti 2024 Shubh Muhurat)
या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी २५ जून रोजी पहाटे १.२३ वाजता सुरू होईल आणि रात्री ११.१० वाजता समाप्त होईल.
गणपती बाप्पाच्या पूजेची शुभ वेळ
या दिवशी गणपती बाप्पाच्या पूजेची शुभ वेळ पहाटे ५.२३ ते ७.१०, अशी असेल. सायंकाळच्या पूजेची वेळ ५.३६ ते ८.३६ अशी असेल.
चंद्रोदय वेळ
द्रिक पंचांगानुसार २५ जून रोजी रात्री १०.२७ वाजता चंद्रोदय होईल; यात मुंबई, ठाण्यात रात्री १०.२८ ही चंद्रोदय वेळ आहे, रत्नागिरी, पुणे रात्री १०.२३, कोल्हापूरात रात्री १०.१९ , मालवणमध्ये रात्री १०.२१ अशी वेळ आहे, अशाप्रकारे वेगवेगळ्या शहरांमध्ये चंद्रोदयाच्या वेळेत थोडाफार फरक आहे. चंद्रदर्शन आणि पूजा केल्यांतरच हे व्रत पूर्ण मानले जाते.
कृष्णपिंगल चतुर्थीचे महत्त्व
हिंदू धर्मात कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थीच्या व्रताला खूप महत्त्व आहे. हे व्रत विघ्नहर्ता गणपतीला समर्पित आहे. या दिवशी कुटुंबाच्या सुख, समृद्धी व सौभाग्यासाठी हे व्रत पाळले जाते आणि श्रीगणेशाची पूजा केली जाते.