Astrological Prediction In Marathi : आज ४ नोव्हेंबर रोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी दुपारी १ वाजून १० मिनिटांपर्यंत राहील. आज पूर्वाषाढा नक्षत्र संध्याकाळी ६ वाजून १४ मिनिटांपर्यंत राहील. तर गंड योग १ वाजून १५ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तसेच आज राहू काळ पहाटे ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असेल. तर आजचा दिवस १२ राशींसाठी कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…

४ नोव्हेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. मानसिक गोंधळ उडू शकतो. अचानक धनलाभ संभवतो. कौटुंबिक जीवन अनुकूल राहील. अति विचारात वेळ वाया घालवू नका.

diwali 2024 1st october 2024 panchang marathi horoscope mesh to meen
Laxmi Pujan Horoscope : लक्ष्मी कृपेने नोव्हेंबरचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल; कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा तुमचे राशीभविष्य
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी ठरणार भरभराटीचा? भाग्याची साथ ते कामात मिळेल भरपूर यश; वाचा तुमचे राशिभविष्य
Daily Horoscope 25th October in Marathi
Today’s Horoscope, 25 October : पंचांगानुसार आजचा शुभ योग कन्या, धनूससाठी फायद्याचा; वाचा तुम्हाला कोणत्या मार्गाने मिळेल पद, पैसा, प्रतिष्ठा
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक जीवनात गोडवा; मेष ते मीनपैकी कोणत्या राशींना कामात मिळेल भरभरुन यश? वाचा तुमचे भविष्य
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला वाव तर कोणाला होईल अचानक धनलाभ; वाचा तुमचा कसा असणार मंगळवार
29th October 2024 Horoscope Today
Daily Horoscope, 29 October : धनत्रयोदशीला मेष, सिंहसह ‘या’ राशींवर होणार धन-सुखाचा वर्षाव, तुमच्यावर असणार का लक्ष्मीची कृपा? वाचा राशिभविष्य

वृषभ:- जोडीदारासमवेत वेळ मजेत घालवाल. जवळचे नातेवाईक भेटतील. भागिदारीतून चांगला लाभ होईल. चारचौघात तुमचे कौतुक केले जाईल. तुमचा हट्ट पुरवला जाईल.

मिथुन:- आजूबाजूच्या लोकांना ज्ञान वाटाल. नवीन आव्हानांना सामोरे जाल. सर्व कामे सावधगिरीने करावीत. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. कामात सहकार्‍यांची मदत घेता येईल.

कर्क:- प्रेमी लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आवडते छंद जोपासता येतील. दिवस गमती-जमतीत घालवाल. खास व्यक्तीची गाठ पडेल. नवीन काहीतरी शिकायला मिळेल.

सिंह:- उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घरासाठी काहीतरी नवीन खरेदी कराल. सजावटीकडे विशेष लक्ष द्याल. अधिक वेळ घरासाठी द्याल. आईची तब्येत सुधारेल.

कन्या:- साहसी ठिकाणी फिरायला जाल. भावंडांकडून भेट वस्तु मिळेल. तुमच्या धैर्यात वाढ होईल. नवीन कामे उत्साहाने हाती घ्याल. पराक्रम दाखवण्याची संधी मिळेल.

तूळ:-कुटुंबासमवेत अधिक वेळ घालवाल. आवडीचे पदार्थ खाल. दिवस मनाजोगा घालवाल. जोडीदाराच्या तक्रारी सोडवाल. संध्याकाळी मित्रांबरोबर बाहेर जाल.

वृश्चिक:- स्वभावात चांगले बदल दिसून येतील. भूतकाळात फार रमून जाऊ नका. आवडीच्या गोष्टी करण्यावर अधिक भर द्यावा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल. आपल्या मतावर ठाम राहाल.

धनू:- बजेट बिघडणार नाही याकडे लक्ष द्या. मानसिक गोंधळ वाढवून घेऊ नका. मनातील चिंता दूर साराव्यात. दूरच्या प्रवासाचा योग येईल. आध्यात्मिक कार्यात रस घ्याल.

मकर:- मनातील इच्छा पूर्ण होईल. जुने मित्र भेटतील. दिवस मजेत जाईल. व्यापार्‍यांना चांगला लाभ संभवतो. कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल.

कुंभ:- कामातील चंचलता टाळावी. फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केन्द्रित करावे. कामातील उरक वाढवावा लागेल. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. व्यापारी नवीन काम सुरू करू शकतात.

मीन:- परोपकाराची भावना जागृत ठेवावी. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. आज नशीबाची उत्तम साथ मिळेल. जुनी कामे मार्गी लावू शकता. दिवस समाधानात जाईल.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )