India Election 2024 and Modi Government Astrological Predictions : १५ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री १२ वाजता भारत देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. लॉर्ड माऊंटबॅटनच्या यांनी अखंड भारताचे भारत व पाकिस्तान असे दोन तुकडे केले. ज्योतिषशास्त्राविषयी विशेष कुतूहल आणि आस्था असणारे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना उज्जैनचे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री पंडित सूर्यनारायण दास यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री १२:०० वाजताचा शुभमुहूर्त सांगितला होता. त्यामुळे भारताच्या कुंडलीचा विचार करताना ती वेळ महत्त्वाची ठरते.

स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारत देशाला मोठा संघर्ष करावा लागला. स्वातंत्र्याआधी देशात मोठी आंदोलने झाली. भारताच्या स्वांतत्र्यापूर्वी आपले परराष्ट्र धोरण ब्रिटिश सरकारच्या मर्जीनुसार चालत होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांचे आपल्यावरचे नियंत्रण अधिकृतपणे संपले. त्यानंतर आपण भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात केली आणि नागरिकांना काही मूलभूत स्वातंत्र्ये देण्यात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या परराष्ट्र धोरणांवर, स्वातंत्र्य चळवळीदरम्यानची परिस्थिती, आंतरराष्ट्रीय वातावरण, तसेच या काळात देशांतर्गत घडलेल्या घटनांनी आपले परराष्ट्र धोरण मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले.

Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : फक्त ३ दिवसानंतर या राशींचे बदलणार नशीब, शुक्र गोचरमुळे मिळणार अपार पैसा अन् धन
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
ketu nakshatra parivartan 2024
१० नोव्हेंबरपासून ‘या’ ३ राशी कमावणार नुसता पैसा; केतूचे नक्षत्र परिवर्तन २०२५ पर्यंत करणार मालामाल
What are the lucky zodiac signs for November?
नोव्हेंबरमध्ये शनीसह ४ ग्रहांचे होणार गोचर! कर्कसह ‘या’ ५ राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ! आयुष्यातील सर्व संकटे दूर होणार
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी ठरणार भरभराटीचा? भाग्याची साथ ते कामात मिळेल भरपूर यश; वाचा तुमचे राशिभविष्य
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
After Diwali Transit of Venus in Sagittarius will be a sign of prosperity in astrology
दिवाळीनंतर धनाचा दाता शुक्र ग्रह बदलणार चाल! ‘या’ राशींचे उजळणार भाग्य, बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होण्याचा योग
Shani will create Shash Raj
धनत्रयोदशीच्या शुभ मुहर्तावर तब्बल ३० वर्षानंतर शनी निर्माण करणार शश राजयोग; ‘या’ ३ राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य, मिळणार धनसंपत्तीचे सुख

हेही वाचा…Maharashtra Assembly Seats : महाराष्ट्रात विधानसभेच्या किती जागा आहेत? जिल्ह्यानुसार सर्व जागांची यादी एका क्लिकवर वाचा

तर जेव्हा आपण देशाच्या कुंडलीचा अभ्यास करतो त्यावेळेस देशाबरोबरच पंतप्रधानांच्या पत्रिकेचाही विचार करावा लागतो. भारताची गुलामगिरीतून मुक्तता अभिजित या शुभमुहूर्तावर झाली होती. भारताच्या कुंडलीत वृषभ हे स्थिर लग्न असून वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र हा ग्रह कलाकौशल्यासाठी फलदायक ठरतो म्हणूनच कला, सौंदर्य, सिनेमा भारतात श्रेष्ठ दर्जाचा मानला जातो. पण, पराक्रम स्थानातील शुक्र, रवी, शनी, बुध व चंद्र यांचा पंचग्रही योग फारसा शुभ मानला जात नाही. त्यामुळे बुध, चंद्र योगातून मानसिक आरोग्याच्या समस्या येणाऱ्या काळात वाढतील, अशी शक्यता दिसते आहे.

देशातील आर्थिक स्थिती वर- खाली झाल्याने सामान्यांना मोठी आर्थिक झळ बसेल. यात शनी ग्रहाचा मोठा खलनायिकी भाग असेल. थोडक्यात काय तर नामांकित अद्योगपतींचा त्यात मोठा सहभाग राहील. एकूण पाहता देशाचे भवितव्य राजकारणाच्या हाती असते, एकूण देशाच्या पत्रिकेतील शनीची गोचर शनी षष्ठात करीत आहे. त्यामुळे राजकारण्यांची मनमानी वाढेल, आर्थिक घोटाळ्यातील सहभाग उघडकीस येईल आणि भारतीय न्यायव्यवस्थेत त्यांना कठोर शिक्षा होईल, असे चित्र सध्या दिसते आहे.