ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ग्रह बारा राशीत ठराविक कालावधीसाठी असतात. या वेळी राशीमध्ये मित्र आणि शत्रू ग्रह एकत्र येत असतात. त्यामुळे त्याचे चांगले वाईट परिणाम होत असतात. रवि ग्रह एक महिना, चंद्र सव्वा दोन दिवस, मंगळ पावणे दोन महिना, बुध ग्रह २५ दिवस, गुरु एक वर्ष, शुक्र २३ दिवस, शनि अडीच वर्षे, राहु व केतु प्रत्येक राशीत दीड वर्ष असतो. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला विशेष महत्त्व आहे. बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा कारक ग्रह आहे. यावेळी बुध मकर राशीत बसला आहे. ६ मार्चपर्यंत बुधाची चाल बदलणार नाही. ६ मार्च २०२२ पर्यंत बुध मकर राशीत राहील. मकर राशीत बुध असल्यामुळे काही राशी भाग्यवान ठरतात. जेव्हा बुध शुभ असतो तेव्हा माणसाचे निद्रिस्त भाग्यही जागं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ राशीच्या लोकांना या काळात करिअरमध्ये यश मिळेल. धनलाभ होईल. शुभ कार्यात पैसा खर्च होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. हा काळ करिअरसाठी तसेच वैयक्तिक जीवनासाठी शुभ राहील.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. करिअरमध्ये फायदे होतील. बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील. धनलाभ होईल. उत्पन्न वाढेल. गोड बोलून तुमची चांगली प्रतिमा तयार होईल.

संपत्ती आणि वैभव देणारा शुक्र, गुरूच्या राशीत प्रवेश, ‘या’ ४ राशीच्या लोकांना होऊ शकतो जबरदस्त धनलाभ

धनु राशीच्या लोकांना या ४५ दिवसांत प्रत्येक कामात यश मिळेल. चांगल्या कामाचे कौतुक होईल. लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील. जुनी गुंतवणूक लाभ देईल. आपण घरगुती कार खरेदी करू शकता. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे, परीक्षेत यश मिळू शकते.