वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा अतिशय शांत आणि सौम्य ग्रह मानला जातो. बुध ग्रह कन्या आणि मिथुनचा स्वामी देखील आहे. बुध ग्रह सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह असून देवांचा दूत मानला जातो. बुध ग्रह मकर राशीत मार्गस्थ झाला आहे. बुधाची ही स्थिती मकर राशीच्या लोकांवरच परिणाम करेल असं नाही, तर सर्व १२ राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभ-अशुभ प्रभाव पडेल. बुध एका राशीत सुमारे एक महिना संचार करतो, त्यानंतर तो त्याची राशी बदलतो. याशिवाय बुध ग्रह रेवती, ज्येष्ठ आणि आश्लेषा या तीन नक्षत्रांवरही राज्य करतो. ग्रह मार्गस्थ होणे म्हणजे सरळ जातो, तर उलट येण्याच्या स्थितीला वक्री म्हटलं जातं. राशीच्या बदलाप्रमाणेच ग्रहांच्या स्थितीतील हे फेरफारही खूप महत्त्वाचा असतो.

  • मेष: मेष राशीच्या लोकांसाठी बुधाचा प्रवास खूप शुभ असणार आहे. या दरम्यान करिअरमध्ये प्रगती होईल, नोकरीमध्ये नवीन संधी मिळू शकतात. या दरम्यान कुटुंबासोबत जास्त वेळ घालवू शकणार नाही. नात्यात चढ-उतार येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
  • वृषभ: वृषभ राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता दिसत आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ राहील. नवीन संधी उपलब्ध होतील, वैयक्तिक आयुष्यात आनंद येईल. विद्यार्थ्यांना यश मिळताना दिसत आहे आणि या काळात तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे.
  • मिथुन: मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. काही कामे वेळेत पूर्ण होऊ शकत नाहीत. व्यवसायात अपेक्षित नफाही दिसत नाही. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा, कारण धनहानी होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्या.
  • कर्क: कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या कामात अधिक लक्ष द्यावे लागेल कारण चुका होण्याची शक्यता आहे. करिअरच्या बाबतीत सरासरी निकाल मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ संमिश्र लाभ देणारा आहे. वैयक्तिक संबंधांमध्ये जिभेवर नियंत्रण ठेवा, संवेदनशील समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आरोग्य सरासरी राहील.
  • सिंह: सिंह राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश दाखवत आहेत. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे जाऊ शकाल. वैयक्तिक जीवनात आनंद, शांती आणि आराम मिळेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ अनुकूल आहे. तुमचे आरोग्य चांगले राहण्याची शक्यता आहे.
  • कन्या: कन्या राशीच्या लोकांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, या काळात काही चुका होऊ शकतात. यामुळे तुमच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. व्यावसायिकांसाठी काळ अनुकूल आहे. जोडीदाराच्या नात्यात समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्य चांगले राहील.
  • तूळ: तूळ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये काही फायदेशीर परिणाम दिसू शकतात. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील आणि पदोन्नती व इतर लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील आणि नवीन व्यावसायिक संपर्कही निर्माण होतील. आरोग्य चांगले राहील, उत्साही वाटेल.
  • वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांवर नोकरीचा दबाव जास्त असू शकतो. या काळात नोकरी बदलण्याचा विचार करू नका, शांततेने आणि संयमाने काम करा. व्यावसायिकांना हवं तसं यश मिळणार नाही, या उलट नुकसान होण्याची शक्यता आहे. नात्यात चढ-उतार येतील. आरोग्याबाबत जागरूक राहा.
  • धनु: धनु राशीच्या राशीच्या लोकांसाठी करिअरच्या बाबतीत अडचणी वाढू शकतात. आपल्या कामाचे नियोजन करा आणि त्याचे अनुसरण करा. व्यवसाय करणाऱ्यांना सरासरी पैसे मिळण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्यात चढ-उतार येतील. आरोग्याबाबत जागरूक राहा.

सापाचं घरात येणं शुभ की अशुभ!; आर्थिक स्थितीवर काय होतो परिणाम? जाणून घ्या

budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Laxmi Narayan Yog 2025 budh shukra gochar
Laxmi Narayan Yog 2025 : १२ महिन्यांनंतर लक्ष्मीनारायण योगाने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसा व प्रेम; २७ फेब्रुवारीला जगण्याला मिळेल नवे वळण
Vasant Panchami 2025
Vasant Panchami 2025 : २ फेब्रुवारीपूर्वी चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, शनि, सूर्य, गुरूसह ५ ग्रहांच्या कृपेने आर्थिक लाभासह होईल करिअरमध्ये झपाट्याने प्रगती
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
Surya Shani Yuti 2025
Surya Shani Yuti 2025: पिता-पुत्रांची होणार युती, सूर्य-शनिचा दुर्लभ योग ‘या’ चार राशींना देईल बक्कळ धनलाभ? गडगंज श्रीमंती तुमच्या नशिबात…
Six Planets yuti created Auspicious Sanyog at a time
एक दोन नव्हे तर सहा ग्रह एकत्र येणार अन् पाच राशींचे धनी होणार! गडगंज श्रीमंती व सुखाने न्हाऊन निघाल
Saturn and Mercury Conjuction
मौनी अमावस्येला शनीचा जबरदस्त प्रभाव; बुध ग्रहासह निर्माण करणार ‘अर्धकेंद्र राजयोग’, ‘या’ तीन राशी कमावणार पैसाच पैसा
  • मकर: मकर राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम दिसून येतील. कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण आहे, वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य दिसून येईल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची चिन्हे आहेत. आर्थिकदृष्ट्या पैशाचा ओघ चांगला राहील. संबंध चांगले राहतील. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुमचे आरोग्य चांगले राहील.
  • कुंभ: कुंभ राशीच्या लोकांच्या करिअरच्या दृष्टीने हा काळ मध्यम फलदायी ठरू शकतो. पैशाची बचत करणे शक्य होणार नाही. आर्थिकदृष्ट्या, पैशाच्या प्रवाहात चढ-उतार होऊ शकतात. त्यामुळे जोडीदारासोबतच्या नात्यात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने या काळात तुम्हाला मज्जासंस्थेशी संबंधित काही समस्यांमधून जावे लागेल.
  • मीन: मीन राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी यश मिळेल. प्रोत्साहन आणि इतर लाभ मिळण्याची शक्यता वाढेल. व्यवसायात चांगला फायदा होईल. तसेच तुम्ही नवीन कल्पना घेऊन नवीन उपक्रमात प्रवेश करू शकता. संबंध सौहार्दपूर्ण राहतील आणि जोडीदाराशी जवळीक वाढेल. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील.

Story img Loader