ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदलत असतो. प्रत्येक ग्रहाचा राशी बदलाचा ठराविक कालावधी आहे. जसं की चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदलतो. तर शनि ग्रह अडीच वर्षानंतर राशी बदल करतो. याप्रमाणे इतर ग्रहांचा संक्रमण कालावधी ठरला आहे. १२ राशीत ग्रह गोचर करत असतात. कधी कधी एका राशीत एकत्र येतात तेव्हा योग तयार होतो. कधी शत्रू ग्रहांची युती होते तेव्हा विचित्र योग. तर कधी मित्र ग्रह एकत्र येतात शुभ योग तयार होतो. राशी बदल आणि योगाचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, या महिन्यात एकाच दिवशी चार ग्रह एकत्र येणार आहेत. त्यामुळे मकर राशीत चतुर्ग्रही योगाची निर्मिती होणार आहे. बुद्धिमत्ता आणि व्यापार देणारा बुध आणि कर्माचा दाता शनिदेव मकर राशीत आधीपासूनच आहेत. येत्या २६ फेब्रुवारीला ग्रहांचा अधिपती मंगळ मकर राशीत प्रवेश करेल. तर २७ फेब्रुवारीला धन आणि वैभव देणारा शुक्रदेवही याच राशीत येणार आहे. त्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होईल. या योगाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. पण चार राशी आहेत, त्यांना विशेष फायदे होऊ शकतात.
मेष: तुमच्या राशीतून दशम भावात म्हणजेच करिअर, नोकरी असलेल्या स्थानात चतुर्ग्रही योग तयार होईल. त्यामुळे हा योग तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे. यावेळी तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते किंवा तुमची बढती होऊ शकते. व्यवसायात लाभ होऊ शकतो. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. यावेळी तुमची कार्यशैलीही सुधारेल, ज्यामुळे तुमच्या कार्यालयात तुमच्या कामाचं कौतुक होईल.
वृषभ: तुमच्या राशीच्या नवव्या म्हणजेच भाग्य, आध्यात्मिक स्थानात चतुर्ग्रही योग तयार होत आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच, तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळेल. यासोबतच विद्यार्थ्यांना यावेळी नशिबाची पूर्ण साथ मिळेल. ृस्पर्धात्मक परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे.
Astrology 2022: २४ फेब्रुवारीला शनिदेवांच्या उदयामुळे राजयोग, पाच राशींना होणार लाभ
वृश्चिक: तुमच्या राशीच्या नवव्या म्हणजेच पैसा आणि वाणी असलेल्या घरात चतुर्ग्रही योग तयार होईल. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच, जर तुमचे पैसे अडकले असतील तर तुम्ही ते या काळात परत मिळवू शकता. या काळात तुमची संभाषण शैली सुधारेल, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. या काळात तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे.
तूळ: तुमच्या राशीच्या चतुर्थ म्हणजेच सुख, मातृ स्थानात चतुर्ग्रही योग तयार होईल. ज्यांना वैयक्तिक जीवनात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी चतुर्ग्रही योग चांगली बातमी घेऊन येईल. या काळात तुम्हाला मनःशांती मिळेल. मुलांशी संबंधित चिंता कमी होईल. यावेळी तुम्हाला राजकारण आणि सामाजिक पद मिळू शकते आणि प्रतिष्ठा वाढेल. त्याच वेळी, तुम्हाला आईची पूर्ण साथ मिळेल आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील.