वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहाच्या अस्ताचा अर्थ असा आहे की ज्यामध्ये कोणत्याही राशीमध्ये विशिष्ट अंतरावर (सुमारे १० अंश) सूर्याजवळ आल्यानंतर ग्रह निष्प्रभ होतो. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रह शनीच्या अधिपत्यातील कुंभ राशीत अस्त होणार आहे. या काळात गुरु ग्रह अप्रभावी होणार आहे. बृहस्पति हा संतती, शुभ कार्यक्रम, विस्तार, भाग्य आणि ज्ञान इत्यादींचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचा गुरु बलवान असेल तर त्याच्यामध्ये चांगले गुण आढळतात. तो आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आहे. दुसरीकडे, गुरू कमजोर असल्यास व्यक्तीचे नशीब साथ देत नाही, तेव्हा त्याच्या नैतिक मूल्यांमध्ये घट होते.
गुरु ग्रह कुंभ राशीत अस्त तिथी वेळ: गुरु ग्रह शनिवार १९ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजून १३ मिनिटांनी कुंभ राशीमध्ये अस्त होईल आणि त्याच राशीमध्ये रविवार, २० मार्च २०२२ रोजी सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी सामान्य स्थितीत परत येईल. कुंभ राशीतील गुरू १९ फेब्रुवारी २०२२ रोजी अस्त आणि शक्तीहीन होईल. या काळात विवाह आणि इतर शुभ कार्यक्रमांचे आयोजन न करण्याचा सल्ला दिला जातो. २० मार्च २०२२ रोजी जेव्हा गुरु ग्रह त्याच्या सामान्य स्थितीत आल्यानंतर फलदायी ठरेल.
मेष : मेष राशीच्या लोकांसाठी गुरूचा अस्त शुभ नसेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायात लाभाची चिन्हे नाहीत. खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी मतभेद टाळा. मानसिक तणावामुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता.
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांच्या इच्छाही अपूर्ण राहू शकतात. नोकरीत बदल होण्याची शक्यता तसेच कमी पगारावर काम करण्याची शक्यता आहे. व्यवसायात मंदी, अपेक्षेपेक्षा कमी नफा, अचानक नुकसान अशा समस्या येऊ शकतात. या काळात तुम्हाला जास्त खर्चाचा सामना करावा लागू शकतो. तुमचा तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतो. आरोग्याबाबत जागरूक रहा.
Mangal Gochar 2022: मंगळ ग्रहाचं २६ फेब्रुवारीला गोचर, चार राशींना मिळणार नशिबाची साथ
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांसाठी या काळात करिअरमध्ये प्रगती शक्य आहे, परंतु तुम्ही तुमची कामे वेळेवर पूर्ण करण्यात अपयशी ठरू शकता. भागीदारी व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात, ज्याचा तुमच्या व्यवसायावरही परिणाम होईल. कौटुंबिक समस्यांमुळे तुमचे तुमच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. आरोग्याविषयी बोलायचे झाल्यास जुन्या समस्या या काळात तुम्हाला त्रास देऊ शकतात.
कर्क : कर्क राशीच्या लोकांना कामात काही अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. कार्य पूर्ण होण्यास जास्त वेळ लागू शकतो. आर्थिक निष्काळजीपणा महागात पडू शकतो. याशिवाय जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. खाण्यापिण्याची काळजी घ्या.