ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कोणता ग्रह राशी बदलतो किंवा त्याचा अस्त-उदय होते तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. देवतांचा गुरु बृहस्पति देखील २२ फेब्रुवारीला अस्त होणार आहे. त्यानंतर २३ मार्चला गुरुचा उदय होईल. गुरु अस्त झाल्यानंतर कोणतंही मंगळ कार्य केलं जात नाही. लग्न मुंडण आणि नामकरण विधी करत नाहीत. गुरुचा प्रभाव नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच वैवाहिक जीवनात अडचणी येतात. गुरूच्या अस्ताचा प्रभाव सर्व राशींवर पडतो. मात्र चार राशी आहेत ज्यांचे विशेष फायदे होऊ शकतात. चला जाणून घेऊया या चार राशी कोणत्या आहेत.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार गुरूची अस्त शुभ मानली जात नाही, परंतु कुंभ राशीमध्ये गुरुची अस्त झाल्यामुळे काही राशींनाही या काळात लाभदायक परिणाम मिळू शकतात. गुरु अस्तादरम्यान शत्रू राशी असलेल्या वृषभ, तूळ, तसेच बुध ग्रहाचं स्वामित्व असलेल्या मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि करिअरमध्ये फायदा होऊ शकतो. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. मोठा करार निश्चित केला जाऊ शकतो, जो भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतो.
ज्योतिषशास्त्रात बृहस्पती ग्रहाला गुरु मानलं जातं. गुरु ग्रह धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे. कर्क ही गुरु ग्रहाची उच्च स्थान असलेली राशी आहे. तर मकर ही गुरुची नीच राशी आहे. गुरु हा ज्ञान, शिक्षक, मुले, मोठा भाऊ, शिक्षण, धार्मिक कार्य, पवित्र स्थान, संपत्ती, दान, पुण्य आणि वृद्धी इत्यादींचा कारक मानला जातो. तसेच, ज्योतिषशास्त्रात, गुरू हा २७ नक्षत्रांमध्ये पुनर्वसु, विशाखा आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्राचा स्वामी आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रहाची कृपा असलेल्या व्यक्तीमध्ये सात्विक गुण विकसित होतात. त्याच्या प्रभावामुळे माणूस सत्याच्या मार्गावर चालतो आणि तो अध्यात्माकडे झुकतो.