ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रहाच्या राशीत बदल होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. नवीन वर्ष २०२२ मध्ये अनेक ग्रह राशी बदल करत आहेत. त्यामुळे दोन आठवड्यांनी किंवा महिन्यांनी प्रत्येक राशीवर प्रभाव पडत आहे. शनि ग्रह अडीच वर्षानंतर २९ एप्रिलला राशी बदलणार आहे. दुसरीकडे शौर्य आणि धैर्याचा दाता मंगळ देखील जानेवारी २०२२ मध्ये संक्रमण करत आहे. मंगळाचे संक्रमण १६ जानेवारी २०२२ रोजी होईल आणि या काळात मंगळ धनु राशीत प्रवेश करेल. मंगळ हा कृती, राग व्यक्त करण्याची क्षमता, प्रेरणा आणि गतिचा कारक मानला जातो. तर शुक्र प्रेम, नातेसंबंध आणि विवाहाचे प्रतिनिधित्व करतो. १६ जानेवारी रोजी मंगळ धनु राशीत प्रवेश करेल. या राशीत मंगळ आणि शुक्र एकत्र येतील. वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ आणि शुक्र यांच्या संयोगाला विशेष महत्त्व आहे. धनु राशीत मंगळाच्या आगमनाने अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील आणि आर्थिक लाभही होतील. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळ आणि शुक्र यांचा संयोग: जेव्हा दोन्ही ग्रह चांगल्या स्थितीत असतात तेव्हा ते एक निष्ठावान, वचनबद्ध आणि उत्कट प्रियकर बनवतात. तथापि, मंगळ आणि शुक्राचा हा संयोग तेव्हाच अनुकूल परिणाम देतो जेव्हा ते कुंडलीत चांगल्या स्थितीत असतात. १६ जानेवारीला मंगळ जेव्हा धनु राशीत प्रवेश करेल तेव्हा तो शुभ स्थितीत असेल. असे असूनही शुक्राची स्थिती यामध्ये अनुकूल राहणार नाही. देवगुरू बृहस्पति हा धनु राशीचा स्वामी आहे, जो शुक्राचाही शत्रू आहे. त्यामुळे शुक्र येथे जीवनातील सकारात्मक पैलूंना प्रोत्साहन देणार नाही. शुक्र २९ जानेवारीपर्यंत वक्री आहे.

धनु राशीतील मंगळाचे संक्रमण: मंगळ आणि शुक्राच्या प्रभावामुळे धनु राशीच्या लोकांमध्ये आध्यात्मिक जीवनाविषयी आवड वाढू शकते. या राशीच्या लोकांना प्रवास करायला आणि साहसाशी संबंधित गोष्टी शोधायला आवडतील. धनु राशीत मंगळाचे संक्रमण तुम्हाला उच्च समर्पण आणि अफाट शक्ती देईल. तथापि, एखाद्याच्या जीवनात सुसंवाद राखण्यासाठी, धनु राशीच्या माणसाने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

Makar Sankranti 2022: सूर्यदेवांना त्यांच्या पत्नीने का दिला होता शाप? मकर संक्रातीशी निगडीत पौराणिक कथा

धनु राशीच्या लोकांसाठी उपाय: धनु राशीच्या लोकांनी गुरुवारी पिवळे कपडे घालावेत. धनु राशीच्या लोकांसाठी लाल, पांढरा, केशरी रंग अनुकूल आहेत. गुरुवारचे व्रत आणि विष्णु सहस्रनामाचे पठण तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. धनु राशीच्या लोकांनी दररोज पाण्यात लाल रोळी आणि लाल फुले टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology 2022 mangal grah gochar in dhanu rashi rmt