ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलत असतो. चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी तर शनि अडीच वर्षानंतर राशी बदलतो. खरं तर या वर्षात बरेच ग्रह राशी बदलणार आहे. शनिही अडीच वर्षानंतर राशी बदल करणार आहे. गोचराच्या कमी अधिक कालावधीमुळे काही ग्रह एका राशीत एकत्र तेव्हा योग जुळून येतात. त्याचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिना खास असणार आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्यातही ग्रहांचे संक्रमण होणार आहे, परंतु यावेळी इतर ग्रहांसोबत काही विशेष योगायोग घडणार आहे. त्यामुळेच फेब्रुवारी महिन्याकडे जगभरातील ज्योतिषांचे लक्ष लागले आहे. या महिन्यात मकर राशीत ग्रहांचा दुर्मिळ योग तयार होणार आहे. फेब्रुवारीच्या शेवटी एकाच राशीत त्रिग्रही, चतुर्ग्रही आणि पंचग्रही योग तयार होतील. ज्योतिषशास्त्रात अशी घटना फार दुर्मिळ आहे. त्यामुळे या ग्रहयोगांमुळे पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालावरही परिणाम होऊ शकतो.
मंगळ आणि शुक्र हे मुख्य ग्रह आहेत. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य देव मकर राशीत आहे. मात्र १३ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजून १२ मिनिटांनी मकर राशीतून निघून कुंभ राशीत जाईल. पुढील महिन्यात १० मार्च रोजी शुक्र, मंगळ आणि शनि हे तीन ग्रह मकर राशीत असतील. याशिवाय बुध आणि गुरु हे दोन ग्रह कुंभ राशीत राहतील. या दिवशी निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. शनि आधीच मकर राशीत आहे, त्यात मंगळ २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजून ४६ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल. मंगळाचं उच्च स्थान आहे. दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजून ५३ मिनिटांनी शुक्र मकर राशीत प्रवेश करेल, यासोबतच चंद्र आणि बुध देखील या राशीत आधीच असतील. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये मकर राशीत पाच ग्रहांचा पंचग्रही योग तयार होणार आहे.
Astrology 2022: बुध ग्रह मकर राशीत मार्गस्थ, १२ राशींवर पडणार शुभ-अशुभ प्रभाव
पंचग्रही योगाचा राशींवर विशेष प्रभाव राहील. विशेषत: मेष, वृषभ आणि मीन राशींसाठी हा महायोग अतिशय शुभ असणार आहे. या काळात या राशीच्या लोकांना आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने फायदे होतील. यासोबतच त्यांचे आरोग्यही चांगले राहील. आर्थिक लाभासोबतच इच्छा पूर्ण होतील, या राशींसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. याउलट धनु, कुंभ आणि मिथुन राशीच्या लोकांना थोडे सावध राहावे लागेल, आर्थिक नुकसान तसेच आरोग्याशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात आणि त्यासोबतच अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागेल.