अशुभ ग्रह राहूला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे १८ महिने लागतात. इतर ग्रहांप्रमाणे राहु ग्रहाचा गोचर सरळ नसून उलट आहे. म्हणजेच हा ग्रह नेहमी मागे फिरतो. यामुळे ग्रह नेहमी राशीच्या मागील राशीत प्रवेश करतो. या ग्रहाचे संक्रमण १२ एप्रिल रोजी होणार आहे. या दरम्यान राहू मंगळाच्या राशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करेल. या राशीतील राहूचे संक्रमण चार राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे.
मिथुन: बुध ग्रह मालकीच्या असलेल्या मिथुन राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण उत्तम राहिल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता दिसत आहे. सर्वत्र आदर मिळेल. परदेश प्रवासाचे योगही होत आहेत. उत्पन्न चांगले राहील. धनसंचय करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल.
कर्क: राहूचे संक्रमण तुमची रखडलेली कामे मार्गी लावेल. तुम्ही चांगले पैसे कमवू शकाल. नोकरी बदलण्याची चांगला योग आहे. कामाच्या ठिकाणी प्रत्येक कामात बॉसचे पूर्ण सहकार्य मिळेल. चांगल्या नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. एकूणच हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल असणार आहे.
वृश्चिक: नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. पगार वाढू शकतो. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर या काळात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता दिसत आहे. या काळात तुमचे मनोबल उंच राहील.
Astrology: २६ फेब्रुवारीपर्यंत धनु राशीत शुक्र आणि मंगळाची युती; चार राशींना धनलाभाचा योग
धनु: या संक्रमणादरम्यान तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्या कामाबद्दल चिंतेत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. अडकलेले पैसे मिळू शकतात. इतर माध्यमातूनही पैसा मिळणे अपेक्षित आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मोठे यश मिळू शकते.