ज्योतिष शास्त्रानुसार शुक्राचे अधिपत्य असलेला केतू ग्रह तूळ राशीत तर मंगळाच्या अधिपत्याखाली असलेला राहू मेष राशीत प्रवेश करणार आहे. राहू-केतू, मंगळ आणि शुक्र या ग्रहांच्या संक्रमणादरम्यान त्याचे परिणाम सारखेच असतील. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, राहु केतू त्यांच्या स्वभावानुसार परिणाम देतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात, राहुला भौतिक गोष्टी, दुराचार, भय, असंतोष, उत्कटता आणि धर्माचा प्रतिनिधी मानला जातो. याउलट ज्या घरामध्ये केतू कुंडलीत स्थित असतो, त्या स्थानाच्या स्वामीनुसार परिणाम मिळतात. हे दोन्ही चांगल्या आणि वाईट कर्मांचे प्रतिनिधित्व करतात. जाणून घेऊया कोणत्या राशींवर काय परिणाम होईल
मेष: मेष राशीच्या लोकांना त्यांच्या नात्याबाबत अधिक काळजी घ्यावी लागेल. कारण या काळात तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. याशिवाय या महत्त्वाच्या प्रसंगादरम्यान तुमच्या आयुष्यात आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात.
तूळ: तूळ राशीच्या लोकांना नातेसंबंधांच्या बाबतीत अधिक सावध राहावे लागेल. या संक्रमणादरम्यान या राशीच्या लोकांनी आरोग्य, आर्थिक बाजूने अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कारण या काळात गुरू आणि शनि हे ग्रह आपल्या गोचर काळात शुभ स्थितीत नाहीत. या संक्रमणादरम्यान शनि चौथ्या स्थानात आणि गुरु सहाव्या स्थानात स्थित असेल.
Astrology: बुद्धीदाता बुध ग्रह तुमचं नशीब बदलू शकतो, जाणून घ्या जोतिषशास्त्रातील उपाय
धनु: या काळात असुरक्षितता आणि भविष्याची चिंता तुम्हाला त्रास देऊ शकते. राहु केतू या राशीच्या लोकांच्या कुंडलीत पाचव्या आणि अकराव्या स्थानात प्रवेश करणार असल्याने. पाचव्या स्थानात राहूची स्थिती धनु राशीच्या लोकांसाठी फारशी चांगली राहणार नाही. याशिवाय नियोजनाअभावी आणि चुकीचे निर्णय घेतल्याने पैसे गमवावे लागू शकतात. याशिवाय केतू ग्रह अनुकूल स्थितीत असेल किंवा व्यक्तीच्या कुंडलीत अनुकूल महादशा चालू असेल तरीही या राशीच्या लोकांना सामान्य फळ मिळेल.