वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ग्रहांचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो. ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदलत असतात. कर्म दाता आणि न्यायदेवता शनिदेव अस्ताला जाणार आहेत. शनिदेव २२ जानेवारीला अस्त होतील आणि २४ फेब्रुवारी २०२२ ला उदय होईल. या दरम्यान शनि ग्रह सुमारे ३३ दिवस अस्त असतील. ३३ दिवसांचा हा काळ चार राशीच्या लोकांसाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो. चला जाणून घेऊया या ४ राशी कोणत्या आहेत.
कर्क : या राशीच्या लोकांसाठी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत त्रास होऊ शकतो. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा डागाळण्याचा धोका असेल. कर्क राशीवर चंद्र देवाचे राज्य आहे आणि वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव आणि चंद्र देव यांच्यात शत्रुत्वाची भावना आहे, त्यामुळे नोकरदार लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळण्यात अपयशी ठराल.
मिथुन : शनिदेवाची स्थिती तुमच्यासाठी शुभ संकेत नाही. यासोबतच मिथुन राशीच्या लोकांसाठी शनी अडीचकी सुरू आहे. त्यामुळे ३३ दिवसांचा हा कालावधी तुमच्यासाठी विशेषतः वेदनादायक ठरू शकतो. या राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पोटाशी संबंधित आजार त्रास देऊ शकतात. खाण्यापिण्यात विशेष काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे अन्न खाणे टाळावे. प्रेमसंबंधांमध्येही अडचणी येऊ शकतात.
या राशीच्या मुलींना मिळतो चांगला नवरा, जाणून घ्या तुमच्या राशीचा यात समावेश आहे का?
कन्या : या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचा फायदा मिळणार नाही. कामात अडथळे येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. तुमचा खर्च अचानक वाढू शकतो. तब्येत बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्या. या राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. या दरम्यान, घसा, छाती, कंबर आणि दात दुखण्याची समस्या असू शकते.
तूळ : या राशीच्या लोकांना करिअर जीवनात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. नोकरीत तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होऊ शकतो. या दरम्यान तुम्हाला प्रत्येक कामात उशिरा यश मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक क्षेत्रात आव्हानांना तोंड देता येते. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात.