वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा उदय तेव्हा त्याचा थेट परिणाम पृथ्वीवर आणि मानवी जीवनावर होतो. धन आणि वैभवाचा दाता शुक्र २७ फेब्रुवारीला शनिदेवाच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला शुभ ग्रह मानले जाते. त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीला भौतिक, शारीरिक आणि वैवाहिक सुख प्राप्त होते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला भौतिक सुख, वैवाहिक सुख, उपभोग-विलास, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य, प्रणय, लैंगिक लालसा आणि फॅशन-डिझाइनिंग इत्यादींचा कारक मानले जाते.
मेष: शुक्र तुमच्या राशीच्या दुसऱ्या आणि सातव्या स्थानाचा स्वामी आहे. करिअर, नाव आणि कीर्ती असलेल्या दहाव्या स्थानात प्रवेश करत आहे. त्यामुळे शुक्राच्या या संक्रमणादरम्यान तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात अनुकूल परिणाम प्राप्त होतील. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला वेतनवाढ मिळू शकते. या काळात तुम्हाला व्यवसायात अचानक फायदा होऊ शकतो. तसेच नवीन व्यवसाय भागीदारी तयार केली जाऊ शकते. त्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो.
वृषभ: शुक्र तुमच्या राशीच्या पहिल्या आणि सहाव्या स्थानाचा स्वामी आहे. अध्यात्म, नशीब आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाचं स्थान असलेल्या नवव्या स्थानात प्रवेश करत आहे. त्यामुळे या संक्रमणादरम्यान तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती दिसेल. यासोबतच तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्हाला यशही मिळेल. तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या व्यतिरिक्त, व्यावसायिक लोकांना या कालावधीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच प्रलंबित कामेही पूर्ण होतील. परदेशातूनही आर्थिक लाभ होऊ शकतो. स्पर्धक विद्यार्थ्यांनाही यावेळी नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
Astrology 2022: १३ फेब्रुवारीला कुंभ राशीत सूर्य आणि गुरूची युती, चार राशींना होणार आर्थिक लाभ
धनु: तुमच्या राशीच्या सहाव्या आणि अकराव्या स्थानाचा स्वामी शुक्र आहे. आता धन, कुटुंब आणि वाणीच्या दुस-या घरात भ्रमण करणार आहे. त्यामुळे या संक्रमण काळात तुमच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येईल. तसेच तुमच्या आरोग्यातही सकारात्मक सुधारणा दिसून येईल. कुटुंबात काही धार्मिक किंवा शुभ कार्य होऊ शकते. या दरम्यान, तुमची संभाषण शैली देखील छान असेल. यासोबतच यावेळी तुम्हाला अडकलेले पैसेही मिळतील. व्यवसायात नवीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे.
मीन: शुक्र तुमच्या संक्रमण कुंडलीत तिसऱ्या आणि आठव्या स्थानाचा स्वामी आहे. लाभस्थान असलेल्या ११ व्या स्थानात गोचर करत आहे. त्यामुळे शुक्राचे हे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी अनुकूल परिणाम देईल. कारण या काळात तुम्हाला व्यावसायिक जीवनात यश मिळेल. तसेच उत्पन्न वाढेल. त्याचबरोबर उत्पन्नाचे नवे स्रोतही निर्माण होतील. अनावश्यक खर्चाला आळा बसेल. भाऊ बहिणीचे सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते. यासोबतच या काळात तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी वाटेल.