वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. हे संक्रमण काही व्यक्तींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ आहे. या वर्षी २०२२ मध्ये बहुतेक ग्रह राशी बदलणार आहेत. प्रतिष्ठेचा कारक असलेला सूर्य ग्रह देखील १३ फेब्रुवारीला शनिच्या कुंभात प्रवेश करणार आहे. सूर्याच्या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. मात्र तीन राशींना विशेष फायदा होऊ शकतो. या राशी कोणत्या आहेत जाणून घेऊयात…
कुंभ : सूर्याचे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. कारण सूर्य ग्रह तुमच्या संक्रमण कुंडलीतील दुसऱ्या (संपत्ती) भावात प्रवेश करेल. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळेल. तसेच उत्पन्न वाढेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यवसायात अचानक फायदा होऊ शकतो.
मिथुन: या राशीच्या लोकांसाठी १३ फेब्रुवारीपासून चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण सूर्य ग्रह तुमच्या संक्रमण कुंडलीच्या नवव्या (भाग्य) भावात राशी बदलणार आहे. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उत्पन्न वाढेल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात तुम्ही नवीन करार करू शकता, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. मिथुन राशीवर बुधाचे राज्य आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य आणि बुध ग्रह यांच्यात मैत्रीची भावना आहे, त्यामुळे हे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
कर्क: सूर्य ग्रहाचे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण सूर्य ग्रह तुमच्या संक्रमण कुंडलीच्या दहाव्या (कर्म) भावात असणार आहे. यामुळे तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. व्यवसायात लाभाचे संकेत आहेत. आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला या काळात फायदा होऊ शकतो.