ज्योतिषशास्त्रानुसार ठराविक कालावधीनंतर ग्रह आपल्या राशीतील स्थान बदलत असतात. त्याचा मानवी जीवनावर प्रभाव पडत असतो. जन्म कुंडली आणि सध्याची ग्रहांची स्थिती यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. ग्रहाची महादशा, अंतर्दशा, शनि अडीचकी, शनि साडेसाती आणि गोचर यावर फळं मिळत असतात. वैयक्तिक कुंडली आणि सर्वसमावेश भविष्य यांची सांगड घालत अनुभव मिळत असतात. सर्वासमावेश भविष्याचं गणित हे त्या त्या वेळाच्या ग्रहांचं गोचर, अस्त, राशीतील स्थान आणि ग्रहांची युती यावर बांधलं जातं. चंद्राचं गोचर दर सव्वा दोन दिवसांनी होत असते, तर शनिचा गोचर अडीच वर्षांनी होतो. असाच कालावधी प्रत्येक ग्रहांचा आहे. त्यामुळे रोज भविष्य वाचणाऱ्या लोकांना संभ्रम पडत असतो. २०२२ वर्षात छोटे मोठे ग्रहांचं गोचर होणार आहे. विशेषत: शनि ग्रहही अडीच वर्षानंतर राशी बदल करणार आहे. दुसरीकडे मान सन्मान आणि प्रतिष्ठाचे दाता असलेला सूर्यदेव १३ फेब्रुवारीला शनिच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरामुळे सर्वच राशींवर प्रभाव पडेल. मात्र चार राशींना या गोचराचा विशेष लाभ होण्याची शक्यता आहे.
मेष: या राशीच्या लोकांसाठी १३ फेब्रुवारीपासून चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण सूर्य देव तुमच्या कुंडलीच्या नवव्या म्हणजेच भाग्य स्थानात भ्रमण करणार आहे. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उत्पन्न वाढेल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात तुम्ही नवीन करार करू शकता, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. मिथुन राशीवर मंगळाचे राज्य आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य देव आणि मंगळ यांच्यात मैत्रीची भावना आहे, त्यामुळे हे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते.
वृषभ: या काळात तुम्हाला अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करण्याची संधी मिळेल. कारण सूर्य तुमच्या राशीच्या दहाव्या म्हणजेच कर्म भावात भ्रमण करेल. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. दुसरीकडे, जर तुम्ही आधीच काम करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता आणि या कामासाठीही हा काळ अनुकूल आहे. सूर्याच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते.
मिथुन: या काळात तुम्ही व्यवसायात चांगली कामगिरी करू शकाल आणि त्यातून चांगला नफा मिळवाल. तुम्ही नोकरी करत असाल, तर या काळात तुम्ही नवीन प्रकल्प यशस्वीपणे हाताळू शकाल. कारण सूर्य देव तुमच्या अकराव्या म्हणजे उत्पन्न स्थानात भ्रमण करणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला अनेक स्त्रोतांकडून उत्पन्न मिळेल. तसेच, यावेळी तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असाल. जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला या काळात फायदा होऊ शकतो.
शनि ग्रह ‘या’ तारखेला होणार मार्गस्थ, तीन राशींना साडेसाती आणि अडीचकीपासून मिळणार मुक्ती
मकर: या राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण शुभ ठरू शकते. कारण सूर्य देव तुमच्या संक्रमण कुंडलीतील दुसऱ्या म्हणजेच संपत्तीच्या स्थानात प्रवेश करेल. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळेल. उत्पन्न वाढेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात अचानक फायदा होऊ शकतो. तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते या काळात मिळण्याची शक्यता आहे.