वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा उदय किंवा अस्त होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. ग्रहांचा राजा सूर्य त्याच्या मित्र गुरुच्या राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याला प्रतिष्ठेचा कारक म्हटले आहे. त्यामुळे सूर्याच्या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर राहील, परंतु चार राशींना विशेष फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊया या चार राशी कोणत्या आहेत.
वृषभ: सूर्याचा ग्रहाचं मीन राशीतील गोचर तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. तुम्हाला व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. कारण सूर्य देव तुमच्या राशीतून अकराव्या स्थानात म्हणजेच उत्पन्नाच्या स्थानात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. यासोबतच उत्पन्नाचे नवे स्त्रोतही निर्माण होतील. यासोबत नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नवीन करार निश्चित केले जाऊ शकतात.
मिथुन: तुमच्या राशीत सूर्य देवाचे दशम स्थानात म्हणजेच कर्म आणि करिअर स्थानात प्रवेश असणार आहे. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा तुमची बढती मिळू शकते. या काळात तुम्ही व्यवसायात चांगली कमाई करू शकता. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि बुध ग्रहामध्ये मैत्रीची भावना आहे. त्यामुळे सूर्यदेवाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते.
कर्क: सूर्यदेवाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण सूर्य ग्रह तुमच्या नवव्या भावात म्हणजेच भाग्य स्थानात प्रवेश करणार आहे. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जे काही काम हातात घ्याल, त्यात यश मिळेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. देश-विदेशात फिरण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला राजकारणात यश मिळू शकते आणि मोठे पद मिळू शकते. सूर्यदेवाच्या या संक्रमणाने तुम्हाला जीवनात आईची चांगली साथ मिळेल. तुम्हाला जमीन, वास्तू आणि वाहनाचा लाभ मिळेल.
Budh Gochar 2022: बुध ग्रह ६ मार्चला कुंभ राशीत करणार प्रवेश, ‘या’ चार राशींना मिळणार लाभ
कुंभ: तुमच्या राशीत सूर्य देवाचे द्वितीय स्थानात म्हणजेच धन आणि वाणीचे स्थानात प्रवेश असणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच अडकलेले पैसे मिळू शकतात. ज्यांचे करिअर भाषणाशी निगडीत आहे, त्यांच्यासाठीही हा काळ चांगला जाणार आहे. वाहन आणि जमीन, मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी वेळ उत्तम आहे. तुम्हाला राजकारणात यश मिळू शकते आणि तुम्हाला मोठे पद मिळू शकते.