आजच्या युगात प्रत्येक तरुण स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतो. वास्तविक, व्यवसाय करणार्‍या लोकांसमोर व्यवसाय न चालण्याची समस्या रोज येत राहते. व्यापार्‍यांचे एकच उद्दिष्ट असते की त्यांचा व्यवसाय अपेक्षेपलीकडे वाढला पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता दिवसेंदिवस नवीन कंपन्या सुरू होत आहेत. मात्र व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे अनेक कंपन्यांना लवकरच कुलूप लागले आहे. व्यवसायात कठोर परिश्रमाबरोबरच इतरही अनेक छोट्या गोष्टी आहेत ज्यांचा अवलंब केल्यास व्यवसायात फायदा होतो. तुम्हाला ज्योतिष आणि वास्तुशी संबंधित असे काही उपाय सांगणार आहोत, जे केल्याने तुम्हाला व्यवसायात फायदा होऊ शकतो.

यंत्र पूजा

हिंदू धर्मानुसार यंत्रांचा प्रभाव खूप सकारात्मक असतो आणि त्यांची पूजा केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि जीवनात आनंद मिळतो. व्यवसायात नफा आणि प्रगतीच्या दृष्टिकोनातून तुम्ही व्यापार वृद्धी यंत्राची पूजा करू शकता. शुभ मुहूर्त पाहून या यंत्राची स्थापना करा. दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील रविवार या यंत्राच्या स्थापनेसाठी शुभ मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या यंत्राची पूजा करताना, “ओम श्रीं ह्रीं क्लीम महालक्ष्मीय नमः” चा जप करण्यास विसरू नका.

पिंपळाच्या पानाचा उपाय

ज्यांना व्यवसायात सतत अपयश येत आहे त्यांनी दर मंगळवारी पिंपळाच्या ११ पानांवर लाल चंदनाने राम-राम लिहून हनुमान मंदिरात जाऊन अर्पण करावे. हा उपाय केल्याने व्यवसायात कधीही अपयश येत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

वास्तु उपाय

व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने उत्तर दिशेच्या भिंतीवर हिरव्या पोपटाचे चित्र लावावे कारण हिरवा हा बुध ग्रहाचा रंग आहे. उत्तर दिशेला हिरव्या पोपटाचे चित्र लावल्याने तेथील दोष संपतो आणि व्यक्तीला शुभ परिणाम मिळू लागतात.

व्यवसाय वाढीच्या युक्त्या

तुमच्या दुकानात किंवा कामाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी तुमच्या उजव्या हाताचा अंगठा जमिनीवर आणि नंतर तुमच्या डोक्यावर किंवा हृदयावर ठेवा. यातून तुम्हाला खूप फायदा होईल. व्यवसाय वाढीसाठी हा एक अतिशय सोपा उपाय आहे.

लक्ष्मी नारायण मंदिरात दर शुक्रवारी गूळ आणि हरभरा वाटप केल्याने व्यवसायात वाढ होते, याशिवाय सुगंधी अगरबत्ती लावून मंदिरातील लक्ष्मीच्या मूर्तीसमोर प्रार्थना करावी.

ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की व्यवसायाच्या वाढीसाठी कुत्रे, गाय आणि कावळ्यांना भाकरी खायला द्यावी.

कापूर आणि कुंकू जाळल्यानंतर त्याची राख एका पेपरमध्ये ठेवा आणि ती तुमच्या दुकानात किंवा घराच्या ठिकाणी ठेवा जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology according to astrologer there can be growth in business new avenues can be opened scsm