Budh Gochar २०२४ : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २० फेब्रुवारी २०२४ ला सकाळी ५ वाजून ४८ मिनिटांनी बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. बुध गोचरचा काही राशींना फायदा होऊ शकतो. या राशीसाठी चांगले दिवस सुरू होईल. करिअर असो किंवा व्यवसाय या राशींच्या लोकांना भरपूर यश मिळेल आणि आर्थिक लाभ होईल. ‘या’ राशीच्या लोकांना पाच दिवसानंतर बक्कळ पैसा मिळण्याची शक्यता आहे. त्या राशी कोणत्या? जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ

बुध ग्रहाचे गोचर वृषभ राशीसाठी अतिशय फायद्याचे ठरू शकते. बुध ग्रह वृषभ राशीच्या पाचव्या घरात असेन ज्यामुळे धनलाभ होऊ शकतो. पैसा कमावण्याची संधी समोर येईल त्याचबरोबर पैशांची बचत करण्याचे अनेक नवीन मार्ग सुरू दिसेल. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. या लोकांचे कामाबाबत कौतुक केले जाईल.

मिथुन

बुध ग्रह मिथुन राशीच्या लोकांचे नशीब पालटणार. बुध ग्रहामुळे या राशीच्या लोकांना सर्व ठिकाणी आनंदाची बातमी मिळेल. यांना ऑफिसमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि ते कौटुंबिक सुखाचा आनंद घेऊ शकेल. चांगल्या नोकरीची संधी समोर येईल. आर्थिक वृद्धी होईल.

हेही वाचा : Ganesha Jayanti : गणेश चतुर्थी आणि गणेश जयंतीमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या, गणेश जयंती का साजरी केली जाते?

सिंह

बुध ग्रह सिंह राशीच्या सातव्या घरात असेल. त्यामुळे या राशीच्या लोकांना पार्टनरशिपशी संबंधित कामात यश मिळेल. करिअरच्या दृष्टीकोनातून या राशीच्या लोकांना भरपूर यश मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकार्य लाभेल. वरिष्ठ तुमचे मत ऐकून घेईल ज्यामुळे तुम्हाला एक वेगळी ओळख निर्माण होऊ शकते.

तुळ

बुध गोचर तुम्हाला अध्यात्मिक जगात घेऊन जाईल. करिअरच्या दृष्टीकोनातून विचार केला तर या राशीच्या लोकांची पदोन्नती होऊ शकते आणि कामाचे कौतुक केले जाऊ शकते. मेहनतीच्या जोरावर या लोकांना फळ मिळेल.जर तुळ राशीचे लोक क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करत असाल तर याचा फायदा त्यांना नक्की होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology budh gochar will get more and more money to these zodiac signs these people will become rich ndj