Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त या नावांनीही ओळखले जात असे. भारतीय इतिहासानुसार, चाणक्य ही अत्यंत ज्ञानी व्यक्ती होती; ज्यांची धोरणे खूप प्रसिद्ध आहेत. चाणक्य नीती आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करते. इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांसह आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक जीवनाबाबतही मार्गदर्शन केले आहे. जर लग्नाचा मुद्दा असेल, तर योग्य जीवनसाथी निवडणे खूप महत्त्वाचे आहे म्हणूनच चाणक्य नीतीमध्ये पत्नी कशी असावी? लग्न करताना स्त्रियांमध्ये कोणते गुण पाहावेत याबाबत सांगितले आहे.
आज या लेखात चाणक्यांनी नमूद केल्यानुसार विवाहासाठी पात्र असलेल्या स्त्रीच्या गुणांबाबत जाणून घेणार आहोत; जे पती आणि कुटुंबासाठी खूप भाग्यकारक मानले जातात. अशा स्त्रीचे पाऊल घरात पडले, तर जीवनात सुख आणि सौभाग्य कायम टिकून राहते, असे मानले जाते..
धार्मिक स्त्री
धार्मिक कार्यात रुची असलेली स्त्री कुटुंबात सुख-शांती राखण्यात कुशल मानली जाते. असे मानले जाते की, जे लोक धार्मिक कर्मे करतात, त्यांना वाईट कृत्यांची भीती वाटते. आपल्या धर्माचे पालन करणारी स्त्री जीवनातील प्रत्येक परिस्थितीत यश मिळवते. त्याचबरोबर नियमानुसार पूजा केल्याने घरामध्ये सौभाग्य कायम टिकून राहते.
हेही वाचा – घरात कबूतर येणे शुभ असते की अशुभ? जाणून घ्या काय सांगते शकुन शास्त्र
सुसंस्कृत स्त्री
बाह्य सौंदर्याबरोबरच आंतरिक सौंदर्यही महत्त्वाचे आहे. तुमची जगण्याची पद्धत तुमच्या वागण्यातून ओळखली जाते. दुसरीकडे एक सुसंस्कृत स्त्री नेहमी आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर करते आणि त्यांची काळजीही घेते.
हेही वाचा – शुक्र उदय होताच ‘या राशींचे नशीब पालटणार? नोकरी आणि व्यवसायातही प्रगती होण्याची शक्यता
साथ देणारी स्त्री
चाणक्यांच्या मते, जी स्त्री प्रत्येक परिस्थितीत आपल्या कुटुंबाला आणि पतीला साथ देते, ती आयुष्यात गोडवा निर्माण करू शकते; मग भले ती परिस्थिती आर्थिक, सामाजिक किंवा कौटुंबिक स्थिती असो. सद्गुणी स्त्री आपल्या कुटुंबाला आणि पतीला प्रत्येक कठीण प्रसंगात साथ देते आणि समतोलही राखते.