Astrology Family Relation: ज्योतिष शास्त्रामध्ये आपण एखाद्या व्यक्तीचे भविष्य आणि त्याचे व्यक्तिमत्व जाणून घेऊ शकतो. जगात जर सर्वात सुसंवादी नाते असेल तर ते सासू-सुनेचे नाते आहे. सासू आणि सून यांचे नाते फार वेगळे असते. सासू -सुनेचं नातं हे फार संवेदशील असतं. जिथे या नात्यात अपार प्रेम दिसते तर कधी सासू-सून यांच्यातील नाते हे दैनंदिन वादांसाठीही ओळखले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून लग्नानंतर मुलीला आईच्या घरी जितके प्रेम मिळते तितकेच प्रेम सासरी मिळेल की नाही, याचाही अंदाज लावता येतो. किंबहुना, प्रत्येक आई-वडिलांबरोबरच मुलीलाही लग्नानंतर सासरच्या मंडळींसोबत कसे जमणार किंवा तिथल्या त्यांच्या वागण्याला उभी राहू शकेल की नाही, अशी भीती वाटते. ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून आपण अशा पाच राशीच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या लग्नानंतरही केवळ आपल्या आई-वडिलांच्या घरच्याच लाडक्या राहत नाहीत तर सासू-सासऱ्याच्या घरच्याही लाडक्या बनतात. ज्योतिषशास्त्रात अशा काही राशी सांगितल्या आहेत, त्या राशींच्या सुनांचे त्यांच्या सासूशी खूप प्रेमळ नातं असतं.

(हे ही वाचा : शनिचा ‘शश राजयोग’ बनल्याने येत्या २ महिन्यात वाऱ्याच्या वेगाने सुसाट धावेल ‘या’ राशींचे भाग्य? ‘या’ रूपात लक्ष्मी येऊ शकते दारी )

‘या’ राशींच्या सुनेचे सासूंशी असते घट्ट नाते

मेष राशीच्या मुली

ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीच्या मुली सासरच्या घरात सगळ्यांच्याच आवडत्या असतात. सासरी सर्वांशी प्रेमाने वागतात. आपल्या प्रेमाने आणि आपुलकीने सर्वांची मने जिंकतात. त्यामुळे या राशीच्या मुली सासूबाईंच्या आणि कुटुंबातील सर्व लोकांच्या लाडक्या असतात.

सिंह राशीच्या मुली

या राशीच्या मुली खूप आत्मविश्वासी असतात. त्यांच्या सासरी येणाऱ्या प्रत्येक समस्येला त्या स्वतःहून तोंड देतात.  त्यांच्या स्वभावावर सासरचे लोक आनंदी राहतात. यामुळेच या सासूबाईंच्या लाडक्या असतात.

मिथुन राशीच्या मुली

या राशीच्या मुली प्रत्येक गोष्ट त्या नियमाच्या चौकटीत राहून करणे पसंत करतात. त्यामुळे त्या स्वतः चुकत नाहीत आणि घरच्यांना चुकू देत नाहीत. त्यामुळे सासरची मंडळी त्यांच्यावर खुश असतात.

(हे ही वाचा : Chanakya Niti: पालकांनो, तुमची मुलं ‘अशी’ वागत असतील तर वेळीच व्हा सावध! नाहीतर भविष्य अंधारात गेलेच म्हणून समजा )

तूळ राशीच्या मुली

या राशीच्या मुली अगदी साध्या असतात. सगळं विचार करून बोलतात. त्यांच्या बोलण्याने कोणाला वाईट वाटणार नाही, याची ते नक्कीच काळजी घेतात. परंपरांचे पालन कसे करावे, हे त्यांना चांगले माहीत असते. त्यामुळेच त्यांची ही सवय सासूबाईंना खूप आवडते.

धनु राशीच्या मुली

ज्योतिष शास्त्रानुसार, या राशीच्या मुली खूप मोकळ्या स्वभावाच्या मानल्या जातात. सासरच्यांनाही त्या आपल्या स्वभावाने जिंकून घेतात. सासरच्या घरी ते खूप जीव लावतात. सासरच्या परिस्थितीशी त्या जुळवून घेतात. त्यामुळेच या राशींच्या मुलींना सासरच्या घरात मान मिळतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology family relation lucky daughter in law zodiac these five zodiac sign girls darlings of mother in law pdb