हिंदू धर्मात लग्न हा विधी अत्यंत पवित्र मानला जाते. प्रत्येक माणसासाठी लग्नानंतरचं नातं महत्त्वाचं असते. हे नाते माणसाला सात जन्मांसाठी बांधते, असे मानले जाते. संसारात अडचणी असणारच आणि भांडणंही होतात. मात्र अशावेळी चांगला साथीदार लागतो. साथीदार अडचणीच्या वेळी हजर असला तर लग्न कशासाठी ते नीट कळतं. यामुळेच लग्नापूर्वी वधू-वरांची कुंडली पाहिली जाते. जेणेकरून वैवाहिक जीवनात कोणताही अडथळा येणार नाही. चला जाणून घेऊया कुंडलीचे पाच शुभ योग जे वैवाहिक जीवन सुखमय करतात.
ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत दुसरे आणि चौथे घर बलवान असते. त्यांचे वैवाहिक जीवन नेहमीच सुखमय असते. खरे तर कुंडलीतील दुसरे घर वैयक्तिक आयुष्यासाठी आहे. तर चौथे घर वैवाहिक जीवनाचे नवीन नाते दाखवते. जर कुंडलीत शुक्र ग्रहासोबत गुरु शुभ स्थितीत असेल आणि पाचव्या, नवव्या, अकराव्या घरात असेल तर त्याचे वैवाहिक जीवन सुखकर असते. अशा स्थितीत लग्नानंतरही पती-पत्नीच्या नात्यात आनंद कायम राहतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सातव्या घरात गुरु आणि सातव्या घराचा स्वामी शुभ स्थितीत असेल तर वैवाहिक जीवन अनुकूल राहते. याशिवाय कुंडलीत अनुकूल स्थिती निर्माण होत असली तरी वैवाहिक जीवन आनंदी असते.
Swapna Shastra : अशी स्वप्ने देतात संपत्तीची सूचना, जाणून घ्या काय सांगतं स्वप्न शास्त्र
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पाचव्या स्थानात किंवा कोणत्याही उच्चस्थानात शुक्र स्थित असेल तर त्या व्यक्तीला वैवाहिक जीवनात अपार सुख प्राप्त होते. तथापि, या स्थितीत सातव्या घराचा स्वामी देखील मजबूत स्थितीत असावा. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीचे सातवे घर बलवान असेल आणि लाभदायक महादशा शुभ संयोग असेल तर ते देखील चांगले वैवाहिक जीवन दर्शवते.