Chaitra Navratri 2025: हिंदू पंचागनुसार, या वर्षी चैत्र नवरात्रीची सुरुवात ३० मार्चपासून होत आहे. यंदा चैत्र नवरात्रीची सुरुवात रविवारपासून होत आहे त्यामुळे देवीचे वाहन हत्ती असणार आहे. चैत्र नवरात्रीच्या एकदिवसापूर्वी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होणार. चैत्र नवरात्रीदरम्यान माता दुर्गाची ९ स्वरुपात पूजा आणि अर्चना केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शनि देव मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. अशात चैत्र नवरात्रीचा सण काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या लोकांवर चैत्र नवरात्रीदरम्यान विशेष कृपा दिसून येईल.
कर्क राशी
ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांसाठी नवरात्री आणि त्यानंतरचा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या दरम्यान नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकतात. करिअरमध्ये जबरदस्त फायदा मिळू शकतो. मानसिक अडचणींपासून सुटका मिळू शकते. दांपत्य जीवनात उत्तम राहीन. कुटुंबातील सदस्यांबरोबर चांगले संबंध निर्माण होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. व्यवसायादरम्यान जबरदस्त नफा मिळू शकतो.
कन्या राशी
चैत्र नवरात्री कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दरम्यान कन्या राशीच्या लोकांना शुभ परिणाम दिसून येईल. या लोकांच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. सामाजिक कार्यांमध्ये मन लागेल. माता दुर्गेच्या कृपेने या दरम्यान या लोकांचे बिघडलेले काम पूर्ण होईल. नोकरी करणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. नातेवाईल प्रियजनांकडून प्रेम आणि आशीर्वाद लाभेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी मिळू शकते. भौतिक सुखामध्ये वृद्धी होईल.
तुळ राशी
चैत्र नवरात्री दरम्यान तुळ राशीच्या लोकांचे आर्थिक संकट दूर होईल. नवरात्रीनंतर धन प्राप्तीचे अनेक नवीन स्त्रोत प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. घर कुटुंबात कोणतेही शुभ किंवा मांगलिक कार्य संपन्न होईल. आर्थिक जीवनातील अडचणी दूर होईल. माता दुर्गेच्या कृपेने धाडसीपणा वाढेल.
मकर राशी
चैत्र नवरात्री मकर राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. या दरम्यान करिअरशी संबंधित अडचणी दूर होईल. कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना या दरम्यान जबरदस्त लाभ मिळू शकतो. व्यवसायात आर्थिक प्रगती मिळू शकते. कुटुंबामध्ये आई वडिलांचा आशीर्वाद प्राप्त होईल, जोडीदाराचे सहकार्य लाभेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. जोडीदाराकडून शुभ वार्ता मिळू शकते. देवीच्या कृपेने मनाप्रमाणे नोकरी मिळू शकते. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेऊ शकता.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)