Gemini Astrological Predictions 4 february 2025 : आज ४ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे. मंगळवारी रात्री २ वाजून ३१ मिनिटांपर्यंत ही सप्तमी तिथी राहील, तर दुपारी १२ वाजून ०६ मिनिटांपर्यंत शुभ योग जुळून येईल. तसेच रात्री ९ वाजून ५० मिनिटांपर्यंत अश्विनी नक्षत्र जुळून येईल. आज रथसप्तमी साजरी केली जात आहे, या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. आज सूर्य देवतेच्या कृपेने मिथुन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस नेमका कसा जाईल, त्यांच्या आयुष्यात नेमके कोणते बदल घडतील जाणून घेऊ…
मिथुन राशीच्या व्यक्तींना कसा जाईल आजचा दिवस (How will today be for Gemini people?)
मिथुन राशीच्या लोकांना आज हातातील कामात यश येईल. वडीलधार्यांचा योग्य मान राखाल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. तुमच्यातील सज्जनपणा दिसून येईल. जवळचे नातेवाईक भेटतील.
मिथुन राशीचे आजचे आर्थिक राशिभविष्य (Astrology Predictions: Gemini Finance Horoscope Today)
तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढणार आहेत. पण तुमच्या रोजच्या खर्चातही वाढ होईल. व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला मोठं यश मिळेल.
मिथुन राशीचे करिअरविषयीचे राशिभविष्य (Astrology Predictions: Gemini Career Horoscope Today
सरकारी क्षेत्रात चांगल्या कामाची संधी मिळेल. व्यवसायाच्या दृष्टीने विचार करणाऱ्या लोकांना काही गोष्टींचे ज्ञान मिळणे आवश्यक आहे. तुम्ही वरिष्ठ सदस्यांशी कोणत्याही विषयावर वाद घालू नका, अन्यथा त्यांना तुमच्या बोलण्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.
मिथुन राशीचे आजचे नातेसंबंधांविषयीचे राशिभविष्य (Astrology Predictions: Gemini Love Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस सामान्य असणार आहे. कौटुंबिक नात्यात काही गैरसमज असतील तर तेही दूर होईल. तुम्ही तुमच्या मित्र- मैत्रिणींपासून थोडे अंतर ठेवून रहावे, तुमच्या घरी पाहुणे आल्याने कुटुंबातील सदस्य व्यस्त राहतील. जोडीदाराच्या शोधात असलेल्या लोकांना त्यांच्या आवडीचा जोडीदाराला भेटू शकतो.