Budh Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला संपत्ती, व्यवसाय, बुद्धी याचा कारक मानले जाते, त्यामुळे बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा सर्व राशींवर परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, येत्या २४ जुन २०२३ ला बुध मिथुन राशीत प्रवेश करणार आहे आणि बुधाचे गोचर काही राशींच्या लोकांचे करिअर आणि आर्थिक परिस्थितीही सुधारू शकतात. त्या राशी कोणत्या, जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार बुधचे राशी परिवर्तन वृषभ राशीसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे आणि बुध राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. असं म्हणतात की त्यांना नवी नोकरी मिळू शकते आणि प्रमोशनसुद्धा होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना भरपूर आर्थिक फायदा होऊ शकतो, असेही मानले जाते.

हेही वाचा : १४० दिवस ‘या’ राशींवर बरसणार पैशांचा पाऊस? शनी महाराज १२ राशींच्या नशिबाला कशी देतील कलाटणी?

कन्या
कन्या राशीच्या लोकांना बुध ग्रहाचे राशी परिवर्तन आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरणार आहे, असे मानले जाते. कन्या राशींच्या लोकांच्या करिअरमध्ये मोठे बदल दिसून येणार आणि नवे पद, पगारवाढ, नवी नोकरी त्यांना मिळू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांचा नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढणार आहे.

हेही वाचा : Weekly Horoscope : ‘बुधाचा अस्त होताच ‘या’ राशींच्या नशिबाला कलाटणी? सात दिवसांमध्ये होऊ शकता धनवान!

कुंभ
असं म्हणतात की, बुधचे गोचर कुंभ राशीसाठी अत्यंत शुभ असणार आणि कुंभ राशीच्या लोकांच्या अडचणी दूर होऊ होणार. त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील. ज्योतिषशास्त्रानुसार, या लोकांना इन्व्हेस्टमेंटमध्ये मोठा फायदा आणि अपार धनलाभ होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)