मेष
- ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांचा खूप धाडसी स्वभाव असतो आणि ते नेहमी निर्भयी असतात. असे मानले जाते की संकटाचा ते हसतमुखाने सामना करतात आणि प्रत्येक संकटातून ते मार्ग काढतात.
- ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीच्या लोकांना आयुष्यात नवनवीन गोष्टी करण्याची नेहमी इच्छा असते त्यामुळे ते अष्टपैलू असतात.
- या राशीचे लोक हसतमुख स्वभावाचे असतात, असे मानले जाते. या लोकांमध्ये नेहमी ऊर्जा भरभरून असते, त्यामुळे ते कोणतीही गोष्ट मन लावून करतात, असं म्हणतात.
- या राशीचे लोक थोडे अहंकारी स्वभावाचे असतात. या राशीच्या लोकांना जे माहिती असतं, तेच ते खरे मानतात.
- हेही वाचा: बारा राशींनुसार जाणून घ्या व्यक्तीचा स्वभाव; वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते?
- या राशीचे लोक खूप जिद्दी असतात आणि त्यांना राग लवकर येतो, असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार, अनेकदा ते कोणत्याही गोष्टीचा विचार न करता निर्णय घेतात, ज्यामुळे त्यांना पुढे अनेक संकटांना तोंड द्यावे लागते.
- असं म्हणतात की या राशीचे लोक खूप जास्त अस्थिर असतात आणि ते एका गोष्टीवर फार काळ टिकत नाहीत त्यामुळे त्यांच्या पदरी अनेकदा अपयश आणि निराशा येते.
वृषभ
- ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचे लोक शांत व प्रेमळ असतात. या लोकांकडे नेहमी धनसंपत्ती भरभरून असते आणि समाजात त्यांना नेहमी आदर-सन्मान मिळत असतो, असे म्हणतात.
- या राशीचे लोक खूप जास्त निश्चयी असतात आणि कठीण प्रसंगात चांगले निर्णय घेतात, असे मानले जाते. हे लोक शिस्तप्रिय असतात, असे म्हणतात. त्यांना इतरांना मदत करायला आवडते, असे मानले जाते.
- वृषभ राशीचे लोक शांत स्वभावाचे असल्याने त्यांना एकटे राहणे आवडते आणि त्यांना नवीन लोकांना भेटायला फारसे आवडत नाही, असे मानले जाते. असे म्हणतात की, हे लोक खूप कष्टाळू असल्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी नेहमी यश मिळते.
- ज्योतिषशास्त्रानुसार हे लोक शिस्तप्रिय असल्याने ते त्यांचे काम चोखपणे वेळेत पूर्ण करतात आणि ते इतरांना प्रोत्साहनही देतात. त्यामुळे अनेक जण त्यांना आपला आदर्श मानतात.
- ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांना नवे मित्र बनविताना अडचणी येतात. त्यामुळे या लोकांना खूप कमी मित्र असतात. हे लोक स्वभावाने जिद्दी व रागीट असतात. त्यामुळे त्यांना अनेकदा याचे परिणाम भोगावे लागतात, असे म्हणतात.
- असे म्हणतात की, या राशीचे लोक आपल्या कुटुंबाला सर्वस्व मानतात आणि कुटुंबाच्या आनंदासाठी ते वाटेल ते करायला तयार होतात. हे लोक पार्टनरला नेहमी सपोर्ट करतात आणि पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात, असे म्हणतात.
हेही वाचा : Aries Horoscope : मेष राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो? जाणून घ्या, ज्योतिषशास्त्र काय सांगते…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा