Shani Vakri 2023: शनिदेवाच्या चालीचा राशींवर परिणाम होत असतो. कधी शुभ तर कधी अशुभ अशा परिणामांचा राशीच्या व्यक्तींना सामना करावा लागतो. १७ जुनला वक्री झालेले शनिदेव ४ नोव्हेंबर पर्यंत एकाच स्थितीत राहणार आहे. याचा थेट परिणाम तीन राशींवर पडणार आहे. या राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यांनी आरोग्याच्या बाबतील चुकूनही निष्काळजी करू नये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मकर

मकर राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे, अपेक्षित आहे. कामाबरोबर फिटनेसकडेही जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. खाणे पिण्यावर कंट्रोल ठेवावा. दातांची काळजी घ्यावी. दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट आठवणीने घालावे. यांना डोळ्यांसंबंधीत समस्याही जाणवू शकतात.

हेही वाचा : Chanakya Niti : तुमच्याकडे असतील हे तीन गुण तर तुम्ही असू शकता अत्यंत बुद्धिमान व्यक्ती; सर्वांचे आवडते असू शकता… वाचा, चाणक्य नीती काय सांगते…

कुंभ

या राशीच्या लोकांचा मानसिक तणाव वाढू शकतो कारण सध्या यांच्या राशीत साडे साती सुद्धा सुरू आहे. शनीची वक्री चाल या राशीवर थेट परिणाम करू शकते. जर डॉक्टरांनी कोणत्याही गोष्टीसाठी मनाई केली असेल त्या गोष्टीचे पालन करावे. जर कोणत्याही गोष्टीचे व्यसन असेल तर लगेच सोडावे अन्यथा या राशीच्या लोकांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

हेही वाचा : १७ ऑगस्टपर्यंत सूर्यासारखे चमकू शकते ‘या’ राशींचे नशीब; तुमची रास यात आहे का?

मीन

मीन राशीच्या व्यक्तींना ‘स्पॉंडिलायसिस, मानदुखी, डोकेदुखी आणि स्नायुंच्या दुखण्याचा त्रास जाणवू शकतो. शनीच्या वक्री चालीमुळे यांना शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे यांनी नियमित व्यायम करावा.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology horoscope people having these three zodiac signs will get health problems due to shani vakri 2023 ndj
Show comments