Astrology : राशीनुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व वेगवेगळं असतं. प्रत्येक राशीच्या लोकांना काही ना काही चांगल्या व वाईट सवयी असतात. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींच्या लोकांचा स्वभाव थापा मारण्याचा असतो. याचा अर्थ या राशीचे लोक सरसकट थापाडे असतात असं नाही; पण ते थापा मारण्यात, लोकांना गुंडाळून ठेवण्यात कुशल असतात. खरंच यात काही तथ्य आहे का? याविषयी ज्योतिषशास्त्र काय सांगते जाणून घेऊ या.

मिथुन

जर हेराफेरी करायची गरज भासलीच, तर मिथुन राशीचे लोक यात माहीर असतात. त्यांनी मारलेल्या थापा या खऱ्या म्हणून सहज खपून जातात नि ते पकडले जात नाहीत. मिथुन राशीच्या व्यक्तींना नेहमी स्वत:ची प्रशंसा करायला आवडते. समोरच्याला स्वत:कडे आकर्षित करण्याच्या उद्देशानं ते अशा काही काल्पनिक कथा रचतात की समोरच्या व्यक्तीला ते सगळं खरंच वाटतं आणि त्यामुळे ती व्यक्ती अशा व्यक्तींकडे आकर्षिली जाते.

हेही वाचा : कधीही समाधानी नसतात ‘या’ राशींचे लोक, नेहमी दु:खी असतात?

तूळ

तूळ राशीच्या व्यक्ती खूप भावनिक असतात. या राशीचे लोक इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. या व्यक्तीही वेळप्रसंगी खोटं बोलतात; पण त्यांचा उद्देश त्या परिस्थितीत उदात्त असतो, वेळ सावरण्याचा असतो. इतरांची मनं दुखावली जाऊ नयेत या उद्देशानं ते थापा मारत असतात.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वभाव गूढ असतो. प्रतिकूल परिस्थितीत स्वत:ला व आप्तजनांना वाचवण्यासाठी या व्यक्ती सर्रास अशा काही थापा मारतात की, असं वाटावं की हे सगळं खरंच घडलेलं आहे. त्यांच्या सहज व आत्मविश्वासपूर्ण वक्तव्यामुळे त्यांच्या बोलण्यावर समोरच्या व्यक्ती विश्वासही ठेवतात.

हेही वाचा : हेही वाचा : कधीही समाधानी नसतात ‘या’ राशींचे लोक, नेहमी दु:खी असतात?

सिंह

सिंह राशीचे लोक नेहमी त्यांच्या धाडसी वृत्तीचा नि आपण कसे श्रेष्ठ आहोत हे गाजावाजा करीत सांगतात. स्वभावत:च नेतृत्वगुण असलेल्या या व्यक्तींना साहजिकच आपण केंद्रस्थानी असावं असं वाटत असतं. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याच्या उद्देशानं ते अनेकदा थापेबाजी करायला मागेपुढे बघत नाहीत. या थापा कुणाचंही नुकसान करणाऱ्या नसतात; पण हे लोक कसे मोठे आहेत हे सांगणाऱ्या असतात.

कर्क

थापा मारण्यात कर्क राशीच्या लोकांचा कोणीही हात धरू शकत नाही. बाकीच्या राशीचे लोक एक वेळ थापा मारल्यावर पकडले जातील; पण या राशीच्या लोकांना थापेबाजी करताना पकडणं जरा कठीणच असतं. त्यांना खोटे बोलताना कोणीही पकडू शकत नाही. ज्योतिषशास्त्रातील काही तज्ज्ञांचं असं मत आहे की, जर आपला काही फायदा दिसत असेल, तरच कर्क राशीच्या व्यक्ती थापा मारतात. उगाच कुणाची मस्करी करण्यासाठी किंवा गंमत म्हणून ते थापा मारत नाहीत.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader