श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात शिवशंकराची आराधना केली जाते. श्रावण महिना शिवशंकराला प्रिय असलेल्या राशींसाठी खूप खास असतो, असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींसाठी श्रावण महिना भाग्यवान ठरणार आहे. त्या राशी कोणत्या? चला जाणून घेऊ या …

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष

ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिना मेष राशीसाठी खूप खास मानला जातो आणि या महिन्यात शिवशंकराची या राशीवर कृपा असते. असं म्हणतात की, श्रावण महिन्यात या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील संकटे दूर होऊ शकतात आणि त्यांना मोठी धनप्राप्ती होऊ शकते.

हेही वाचा : Aries Horoscope : मेष राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो? जाणून घ्या, ज्योतिषशास्त्र काय सांगते…

मकर

मकर राससुद्धा शिवशंकराची प्रिय रास मानली जाते आणि या राशीच्या लोकांवर शिवजीची विशेष कृपा असते. असं म्हणतात की, या राशीचे लोक खूप भाग्यवान असतात. या राशीच्या लोकांचा स्वभाव शांत असतो, असं म्हणतात.ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिन्यात या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो.

वृश्चिक

वृश्चिक रास ही शिवशंकराची प्रिय रास मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या राशींसाठी श्रावण महिना अत्यंत शुभ असतो. असं म्हणतात की, श्रावण महिन्यात या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील संकटे आणि अडचणी दूर होऊ शकतात.

हेही वाचा : Surya Grahan 2023: ‘या’ दिवशी आहे वर्षातील दुसरे सूर्यग्रहण; ‘या’ राशींना राहावे लागू शकते सावध, अडचणी वाढणार?

कुंभ

शिवशंकराला प्रिय असणाऱ्या राशींच्या यादीमध्ये कुंभ राससुद्धा आहे, असं म्हणतात. या राशीवर शिवजीची विशेष कृपा असते, असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना नेहमी शुभ असतो. श्रावण महिन्यात या लोकांच्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात आणि त्यांना मोठा धनलाभ होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)