वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार- प्रत्येक महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. १६ जुलैला सकाळी ४ वाजून ५९ मिनिटांनी सूर्य राशीपरिवर्तन करणार आहे आणि १७ ऑगस्टपर्यंत तो कर्क राशीत विराजमान राहणार आहे.
ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि तो सूर्याचा मित्र आहे. सूर्याने कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर काही राशींच्या जीवनात मोठे बदल दिसून येऊ शकतात. त्या राशी कोणत्या, चला तर जाणून घेऊ या ….

हेही वाचा : Chanakya Niti : तुमच्याकडे असतील हे तीन गुण तर तुम्ही असू शकता अत्यंत बुद्धिमान व्यक्ती; सर्वांचे आवडते असू शकता… वाचा, चाणक्य नीती काय सांगते…

मेष

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे कर्क राशीतील प्रवेश
मेष राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. त्यांच्या आयुष्यात मोठे बदल दिसू शकतात. या राशीच्या व्यक्तींना नवे पद मिळू शकते. त्याशिवाय सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची प्रगती होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी त्यांना नव्या गोष्टींची संधी मिळू शकते.

कर्क

सूर्याचा कर्क राशीमध्ये प्रवेश कर्क राशीसाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. शारीरिक समस्या कमी होण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि नोकरीमध्ये नफा होण्याची संधी आहे. जर या राशीचे लोक नोकरी बदलण्याचा विचार करीत असतील, तर हा काळ फायदेशीर ठरू शकतो.

हेही वाचा : Pisces : मीन राशीचे लोक असतात खूप जास्त रोमँटिक; जाणून घ्या कसा असतो त्यांचा स्वभाव?

तूळ

ज्योतिषशास्त्राप्रमाणे, या राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य अकराव्या स्थानावर स्वामी म्हणून विराजमान आहे. त्याचा प्रभाव त्या व्यक्तीच्या थेट करिअरवर पडू शकतो. या काळात पगारवाढीची संधी आहे. या राशींच्या व्यक्तिमत्त्वात मोठे बदल दिसून येऊ शकतात. या राशीच्या लोकांना कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader