ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदलतो. शनि अडीच वर्षानंतर, तर चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदलतो. यामुळे बारा राशींमध्ये भ्रमण करताना अनेक ग्रह एकत्र येतात. त्यामुळे अनेक योग तयार होत असतात. ज्योतिष्यशास्त्रानुसार याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. मकर राशीत असलेला बुध ग्रह ६ मार्च रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तर अस्ताला असणाऱ्या गुरुची सूर्याशी युती होईल. यानंतर १४ मार्चला मध्यरात्री सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. तर २४ मार्चला बुध मीन राशीत प्रवेश करेल, तर महिन्याच्या शेवटी म्हणजेत ३१ मार्चला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. २४ फेब्रुवारीपासून अस्ताला गेलेला गुरू २६ मार्चला मार्गक्रमण करेल. त्यामुळे या महिन्यात १२ राशींवर परिणाम जाणवणार आहे.
- मेष- या महिन्यात तुम्हाला तुमच्या मेहनीचं फळ मिळेल. मात्र कुटुंबाबाबत चिंता असेल. आरोग्याशी संबंधित समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना सामन्य राहील.
- वृषभ- हा महिना आर्थिक दृष्टीने अनुकूल असेल. वाहन खरेदीचा योग आहे. पण कौटुंबिक जीवनात काही अडथळे येण्याची शक्यता आहे.
- मिथुन- या महिन्यात शारीरिक आणि मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्याल. या महिन्यात अधिक खर्च होण्याची शक्यताही आहे.
- कर्क- या महिन्यात लोकांना संमिश्र अनुभूती येईल. कुटुंबात शांतता असेल मात्र भांवडांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून कठीण प्रसंगी चांगली साथ मिळेल.
- सिंह- आर्थिक बाबतीत हा महिना तुमच्यासाठी चांगला जाईल. ग्रहांची योग्य साथ असल्याने अनेक फायदे मिळतील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला असेल.
- कन्या- या महिना तुमच्यासाठी चांगला राहील. कौटुंबिक जीवन तुमच्यासाठी खूप चांगले राहील. घरात खूप चांगलं वातावरण राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील.
- तूळ- या महिन्यात करिअरवर लक्ष केंद्रीत करावं लागेल. कठोर परिश्रम घ्यावे लागतील. या मेहनतीचं फळ भविष्यात मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहील.
Mahashivratri 2022: महाशिवरात्रीला ‘हे’ उपाय केल्याने कुंडलीतील अशुभ ग्रहही देतील शुभ फळ, जाणून घ्या
- वृश्चिक- या महिन्यात काळजीपूर्वक वागावं लागेल. आर्थिन नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच एखादी दुखापत होऊ शकते. असं असलं तरी करिअरमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे.
- धनु- धनु राशीत शनी शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे या गोचरामुळे हा महिना त्रासदायक असेल. कौटुंबिक जीवनात कलह निर्माण होण्याची शक्यता आहे.
- मकर- मकर राशीच्या लोकांना साडेसातीचा मधला टप्पा सुरु आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. कोणत्याही दस्ताऐवजावर स्वाक्षरी करताना काळजी घ्यावी लागेल.
- कुंभ- कुंभ राशीला शनी साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. सत्ताधारी वर्गाशी मैत्री आणि जवळीक वाढू शकते. कौटुंबिक जीवनात कलह होतील. त्यामुळे काळजी घ्यावी लागेल. बोलताना जीभेवर नियंत्रण ठेवावं लागेल.
- मीन- या महिना संमिश्र फळ देणारा असेल. त्यामुळे कुणालाही पैसे उधार देऊ नका. तब्येतीत चढ-उतार दिसून येईल.