Mercury Rise in Scorpio : ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाचा राजकुमार मानले जाते. शुभ ग्रह बुध वेळोवेळी राशी परिवर्तनाशिवाय उदय आणि अस्त सुद्धा होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध देव मंगळ राशीच्या वृश्चिक मध्ये उदित होणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये कोणत्याही ग्रहाचा उदित होण्याचा परिणाम शुभ ठरणार आहे. अशात बुधच्या उदित होण्यामुळे कोणत्या राशींच्या जीवनात सकारात्मकता दिसून येईल आणि नोकरी व्यवसायात कोणते परिवर्तन दिसून येईल, जाणून घेऊ या.
वृषभ राशी
वाणी आणि व्यवसायाचा कार असलेला बुध देव वृषभ राशीच्या ७ व्या भावात उदित होणार आहे. बुध ग्रहाच्या उदित झाल्यामुळे आर्थिक प्रकरणात मोठे यश प्राप्त होईल. करिअरमध्ये कामाच्या बाबतीत प्रवास करावा लागू शकतो, जो अत्यंत लाभदायक आहे. या दरम्यान व्यवसायात खूप लाभ दिसून येईल. व्यवसायात वाढ होऊ शकते. आर्थिक प्रगती होऊ शकते. नात्यामध्ये सुधारणा दिसून येईल.
सिंह राशी
बुध ग्रह या राशीच्या चौथ्या भावात उदित होणार आहे. अशात या दरम्यान धन कमावण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील. व्यवसायाच्या बाबतीत मोठी यात्रा करावी लागू शकते. या दरम्यान मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. तसेच चांगला नफा मिळणार. या लोकांना धन प्राप्ती होईल व त्यांची आर्थिक वृद्धी होईल.
कन्या राशी
बुध देव या राशीच्या तिसर्या भावात उदित होणार आहे. बुध ग्रह या राशीचा स्वामी आहे. या दरम्यान मोठे यश प्राप्त होईल. या दरम्यान यात्राचा मोठा योग निर्माण होईल. विदेशात यात्रा करण्याची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी मन लागणार. व्यवसायात नफा वाढणार. पैसा कमावण्याबरोबर बचत होऊ शकते. प्रेमप्रकरणात एक दुसर्यांबरोबर खुल्या मनाने बातचीत होईल.
हेही वाचा : मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
तुळ राशी
बुध देव या राशीच्या दुसऱ्या भावात उदित होणार आहे. अशात या दरम्यान सर्व लक्ष धनसंपत्ती व पैसा कमवण्यात लागणार. जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण घालवाल. करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. व्यवसायात लाभ दिसून येईल. पैसा कमावण्याचे स्त्रोत वाढतील. नोकरीमध्ये आर्थिक प्रगती होईल. नोकरीमध्ये प्रमोशन होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेन
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)