ज्योतिषशास्त्रात २७ नक्षत्र, ९ ग्रह आणि १२ राशींचे वर्णन केले आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेच्या आधारे, राशीमध्ये स्थित असलेल्या राशीच्या गुण-अवगुणांची माहिती मिळते. इतकेच नाही तर ज्योतिष शास्त्रात गणनेच्या आधारे अशा काही राशी सांगितल्या आहेत, ज्यांच्याशी संबंधित लोकांशी कोणतही सिक्रेट शेअर करू नये. जर तुम्ही त्यांना सिक्रेट सांगितली तर तुम्हीही अडचणीत येऊ शकता. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत ही ३ राशी…
मेष (Aries)
या राशीच्या लोकांशी वाद घालणे किंवा छोट्या-छोट्या गोष्टी सांगणे देखील तुम्हाला अडचणीत आणू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीचे लोक कोणत्याही व्यक्तीच्या सिक्रेट गोष्टी इतरांना सांगण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. त्यामुळे मेष राशीच्या लोकांशी तुमची कितीही घनिष्ठ मैत्री असली तरी तुम्ही तुमच्या सिक्रेट सांगू नका. या राशीच्या लोकांना कोणतीही गोष्ट सांगताना एकदा नक्की विचार करा.
(हे ही वाचा: ‘या’ ४ राशींचे लोक मानले जातात रागीट स्वभावाचे, स्वतःचेच करून घेतात नुकसान)
मिथुन (Gemini)
ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या हृदयाबद्दल काहीही सांगू नये. मिथुन राशीवर बुध ग्रह आहे, ज्यामुळे त्यांना हे गुण मिळतात. त्यांना गॉसिप करायला आवडते. त्याच वेळी, तो इकडे-तिकडे बोलण्यास मागेपुढे पाहत नाही. त्यांनी हे जाणूनबुजून केले असे नाही. काहीवेळा ते नकळत हे देखील करतात कारण त्यांना बोलण्याची खूप आवड असते. अशा परिस्थितीत ते अनेकवेळा सिक्रेट गोष्टी इतरांसोबत शेअर करतात. जरी त्यांना नंतर पश्चाताप होतो.
(हे ही वाचा: Astrology: ज्योतिष शास्त्रानुसार ‘या’ ४ राशीचे लोक कोणाच्या दबावाखाली करत नाहीत काम!)
तूळ (Libra)
ज्योतिष शास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांना कोणतीही गोष्ट इतरांना सांगितल्याशिवाय चैन पडत नाही. तसेच तूळ राशीचे लोक कोणतीही गोष्ट लपवून ठेवू शकत नाहीत. या राशीचा स्वभावच असा आहे की या छोट्या-छोट्या गोष्टीही इतरांना सांगून सांभाळून घेतात. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे जो त्यांना हे गुण प्रदान करतो. त्यामुळे या राशीचे लोक आपले कोणतेही रहस्य सांगण्यासाठी अडचणीत येऊ शकतात.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)